कोल्हापूर - राज्यसभेच्या निवडणूकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 तारखेला निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut ) आणि कोल्हापुरातील संजय पवार यांच्या ( Shivsena Leader Sanjay Pawar ) नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय पवार यांनी अत्यानंद व्यक्त केला. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास, मी आज भरुन पावलो. माझा आनंद व्यक्त करण्याठी माझ्याजवळ शब्द नाहीयेत, अशी प्रतिक्रिया संजय पवार ( Shivsena Rajyasabha Candidate Sanjay Pawar ) यांनी दिली. संजय पवार यांचे कुटुंबिय सुद्धा आनंदात आहेत. आम्हाला अजूनही विश्वास बसत नसल्याची त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
कोण आहेत संजय पवार?- कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते राहिले आहेत. शिवसेना म्हटले की, संजय पवार हाच चेहरा नेहमीच समोर येत असतो. कारण, आजपर्यंत अनेक आंदोलनांमुळे ते नेहमीच सक्रिय राहिले आहेत. 34 वर्षे ते शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत. पुढे त्यांनी आपल्या कामातून स्वतःचे एक वेगळं नाव जिल्हाभर केलं. त्यानंतर ते तीन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. शिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ते उपाध्यक्ष होते. यापूर्वी अनेक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. पण, आता त्यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी देत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचा या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत होत आहे.
हेही वाचा - Neelam Gorhe : काश्मिरी महिला पंडितांच्या हाती शस्त्र द्या; नीलम गोऱ्हेंची केंद्राकडे मागणी