ETV Bharat / city

मोदींनी महाराष्ट्राकडे लक्ष दिले नाही तर सीरममधून एकही लस बाहेर जाऊ देणार नाही -राजू शेट्टी - सिरम इन्स्टिट्यूट बद्दल बातमी

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन करतात तर दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात लसी संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद पडल्याचे त्यांना दिसत नाही आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Raju Shetty warns Central Government to supply vaccine to Maharashtra or else besiege Siram Institute
महाराष्ट्राला लस पुरवठा करा अन्यथा सिरम इन्स्टिट्यूटला घेराव घालू - राजू शेट्टींचा इशारा
author img

By

Published : Apr 9, 2021, 9:12 PM IST

Updated : Apr 10, 2021, 12:21 PM IST

कोल्हापूर - देशात जेवढे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत त्याच्या निम्मे रुग्ण हे केवळ महाराष्ट्रात सापडत आहेत. असे असताना महाराष्ट्राला लसींचा पुरवठा कमी करण्यात येत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन करतात तर दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात लसी संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद पडल्याचे त्यांना दिसत नाही आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शिवाय मोदी सरकारने याकडे लक्ष द्यावे अन्यथा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला घेराव घालून इथे तयार होणारी लस पुण्याबाहेर सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्राला लस पुरवठा करा अन्यथा सिरम इन्स्टिट्यूटला घेराव घालू - राजू शेट्टींचा इशारा

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कडक लॉकडाऊन बाबत चर्चा होण्याची शक्यता

पंतप्रधान, आरोग्यमंत्र्यांना शेट्टींनी लिहले पत्र -

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, की महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये लसीकरण केंद्र लसी अभावी बंद पडत आहेत. शिवाय महाराष्ट्रात दररोज पन्नास हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहिली तर ती अतिशय गंभीर बनली आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे, ही साधी बाब त्यांच्या लक्षात येत नसेल तर त्यासारखे दुर्दैवी काही नाही. मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रालाच कमी लस पुरवठा केला जात आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन तत्काळ लसपुरवठा करावा, अन्यथा ज्या ठिकाणी कोरोना लस तयार होत आहे, त्या पुण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूट'ला घेराव घालून याठिकाणी बनत असलेली लस पुण्याबाहेर सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र पाठवले असल्याचे शेट्टींनी म्हटले आहे.

हेही वाचा - नवविवाहित कन्नड अभिनेत्री चैत्राने केला आत्महत्येचा प्रयत्न

Last Updated : Apr 10, 2021, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.