ETV Bharat / city

गेल्या चार वर्षात ईडी झोपली होती का? साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा हल्लाबोल - चंद्रकांत पाटील

साखर कारखान्यांवर झालेल्या कारवाईबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर नजर टाकून साखर कारखाने उडवणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांवर सडकून टीका केली. गेल्या काही वर्षांपूर्वी मी याबाबत ईडीकडे चौकशीसाठी मागणी केली होती. मात्र, गेल्या चार वर्षात ईडी झोपली होती का? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

राजू शेट्टी
राजू शेट्टी
author img

By

Published : Jul 3, 2021, 7:35 AM IST

कोल्हापूर : साखर कारखान्यांवर झालेल्या कारवाईबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर नजर टाकून साखर कारखाने उडवणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांवर सडकून टीका केली. गेल्या काही वर्षांपूर्वी मी याबाबत ईडीकडे चौकशीसाठी मागणी केली होती. मात्र, गेल्या चार वर्षात ईडी झोपली होती का? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. आज एका कारखान्यावर झालेल्या कारवाई प्रमाणेच राज्यातल्या इतर 41 कारखान्यांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. शिवाय सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घरावर टाकलेला हा दरोडा असून जोपर्यंत कारखाने पुन्हा त्यांच्या मालकीचे होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही माजी खासदार शेट्टी यांनी दिला.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील इतर 41 कारखान्यांची चौकशी लावावी..

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावरूनच राज्यातल्या कारखान्याची चौकशी झाली. चंद्रकांत पाटील स्वच्छ चारित्र्याचे आहेत, त्यांनी राज्यातील उर्वरित 41 साखर कारखान्याची सुद्धा चौकशी लावावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज केली. 'मी कोणाची पाठराखण किंवा आरोप करण्यासाठी याठिकाणी आलो नाही, मात्र जरंडेश्वर सह सर्वच कारखान्यांची लूट झाली आहे. त्यामुळे ते शेतकाऱ्यांना पुन्हा परत मिळाले पाहिजेत,' असेही ते म्हणाले.

चौकशी थांबवतील त्यांच्या घरासमोर आंदोलन करू..

ईडीकडे आम्ही काही वर्षांपूर्वीच कारखान्यांच्या चौकशीबाबत मागणी केली होती. मात्र ईडी चार वर्षानंतर जागी झाली आहे. त्यामुळे त्याचा राजकारणासाठी वापर होतोय की काय? अशी आम्हाला शंका येत आहे. आता सुरू केलेली चौकशी जर थांबली तर ज्यांनी चौकशी लावली त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू. सगळेच काचेच्या घरात राहतात, तुम्हा सर्वांचे बुरखे आता फाटू देत आणि तुम्ही सर्वजण काय लायकीचे आहात, हे महाराष्ट्रातील जनतेला समजु देत. जोपर्यंत कष्टकरी शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने पुन्हा त्यांचे होत नाहीत तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.