ETV Bharat / city

मुंबई बँक भ्रष्टाचाराबद्दल किरीट सोमैय्या गप्प का? राजू शेट्टी यांचा सवाल

भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच आहे. तो कोणत्या पक्षाने केला किंवा कोणत्या अधिकाऱ्याने केला हा मुद्दा गौण आहे.मात्र अलीकडच्या काळात भाजपाचे नेते किरीट सोमैय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.

Raju Shetty on Kirit Somaiyya in Kolhapur
मुंबई बँक भ्रष्टाचाराबद्दल किरीट सोमैय्या गप्प का? राजू शेट्टी यांचा सवाल
author img

By

Published : Sep 24, 2021, 9:10 PM IST

कोल्हापूर - भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे. तो कोणी केला? हा मुद्दा गौण आहे. मात्र किरीट सोमैय्या हे केवळ महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करत आहेत. ते मुंबई बँकेच्या भ्रष्टाचारावर गप्प का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

राजू शेट्टी यांचा सोमैय्यांना प्रश्न -

पुढे राजू शेट्टी म्हणाले की, भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच आहे. तो कोणत्या पक्षाने केला किंवा कोणत्या अधिकाऱ्याने केला हा मुद्दा गौण आहे.मात्र अलीकडच्या काळात भाजपचे नेते किरीट सोमैय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करताना दिसत आहेत. सामाजिक बांधिलकी आणि समाजातील जबाबदार घटक म्हणून किरीट सोमैय्या यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. ते व्यवसायाने सीए असल्यामुळे त्यांना या क्षेत्रातील अधिक माहिती आहे. याबद्दल आमचे दुमत नसल्याचे शेट्टी म्हणाले. मात्र मुंबई बँकेतील घोटाळा संदर्भात ते का बोलत नाहीत. देशातील इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत का बोलत नाहीत? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

'तर लोकांचा भ्रष्टाचार या मुद्यावरून विश्वास कमी होईल'

ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेऊन स्वतःला पवित्र केले आहे. त्या संदर्भात सोमैय्या का बोलत नाहीत. भ्रष्टाचार करणाऱ्यांना चाबकाचे फटके मारुन रस्त्यावर आणले पाहिजे असे माझे मत आहे असे शेट्टी म्हणाले. मात्र किरीट सोमैय्या तसे करताना दिसत नाहीत. त्यामुळे विशिष्ट हेतू ठेवून इतरांना बदनाम करताय का? असे माझ्यासारख्याचे मत होते. त्यामुळे किरीट सोमैय्या यांच्या अशा वर्तनामुळे सर्वसामान्यांच्या भ्रष्टाचार या मुद्यावरून विश्वास कमी होईल असे शेट्टी यावेळी म्हणाले म्हणाले.

हेही वाचा - किरीट सोमैय्या यांना कोल्हापुरात येऊ द्यावे; कोणीही त्यांना विरोध करू नये - हसन मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.