कोल्हापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याला तब्बल बाराशे किलो कांदा विकुन त्याच्या हातात केवळ 13 रुपये शिल्लक राहिले ( Onion prices now cheaper ) आहेत. नुकताच त्याची पावती व्हायरल झाली. बाराशे किलो कांदा विकून शेतकऱ्यांचा हातात 13 रुपये राहत असतील तर ही खूपच चिंताजनक बाब आहे. त्यामुळे शेतात घाम गाळून पिकवलेल्या मालाला काहीच किंमत नाही का, असा सवाल करत या 13 रूपयामधून सरकारचे 13 वे घालावे का? अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ( Raju Shetty criticize Government On Onion Prices ) यांनी दिलीय.
Raju Shetty On Onion Prices : या 13 रूपयांमधून सरकारचा 13 वा घालावा का? राजू शेट्टी संतापले - कांदा दरावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
सोलापूर जिल्ह्यातील बापू कावडे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी 24 पोते कांदे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रूद्रेश पाटील या व्यापाऱ्याला विक्री केले. जवळपास 1123 किलो कांदे विकून या शेतकऱ्याला 1665 रूपये मिळाले. मात्र हमाली, तोलाई, मोटार भाडे वजा केल्यानंतर बापू कावडे यांच्या हातात केवळ 13 रूपये ( Onion prices now cheaper ) मिळाले. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ( Raju Shetty criticize BJP On Onion Prices ) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.