ETV Bharat / city

हे देवा! या सरकारला एफआरपीचे तुकडे न करण्याची सद्बुद्धी दे- राजू शेट्टी - एफआरपीसाठी सरकारला इशारा

केंद्र सरकारने यंदाच्या गाळप हंगामात उसाची एफआरपी ही तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातील शेतकरी आणि विविध संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभरात राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील विविध तीन शक्तिपीठांना साकडे घातले आहे. तसेच 7 ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान त्यांनी राज्यातील विविध शक्तिपीठांना साकडे घालण्यासाठी यात्रा सुरू केली आहे.

एफआरपीचे तुकडे न करण्यासाठी सद्बुद्धी दे- राजू शेट्टी

author img

By

Published : Oct 8, 2021, 9:18 AM IST

Updated : Oct 8, 2021, 9:30 AM IST

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी यांनी गुरुवारी उसाच्या एफआरपीसंदर्भात दख्खनचा राजा जोतिबाला साकडे घातले आहे. उसाला मिळणाऱ्या एफ.आर.पी. चे तुकडे 'न' करण्यासाठी, सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे. यासाठी ज्योतिबाकडे हे साकडे घालण्यात आले. तर येत्या 19 तारखेच्या जयसिंगपूर येथे होणाऱ्या विसाव्या ऊस परिषदेपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारने यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला नाही तर, ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या साक्षीने पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करेल. आणि ते आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

एफआरपीचे तुकडे न करण्यासाठी सद्बुद्धी दे- राजू शेट्टी
एफआरपीचे तुकडे न करण्यासाठी सद्बुद्धी दे- राजू शेट्टी
केंद्र सरकारने यंदाच्या गाळप हंगामात उसाची एफआरपी ही तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला राज्यभरातील शेतकरी आणि विविध संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभरात राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील विविध तीन शक्तिपीठांना साकडे घातले आहे. तसेच 7 ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान त्यांनी राज्यातील विविध शक्तिपीठांना साकडे घालण्यासाठी यात्रा सुरू केली आहे. या माध्यमातून ते सरकारला सद्बुद्धी देण्याची मागणी करणार आहेत.साकडे घालताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. साखर कारखानदार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात हे आंदोलन सुरू असून, येत्या 19 ऑक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहे. ऊस परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याने आता या ऊस परिषदेकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ईडी,सीबीआयचा गैरवापर
ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या राजकीय गैरवापर सुरू आहे. गैरकारभार अथवा भ्रष्टाचार या विरोधात आम्ही नेहमीच लढत आलो आहोत. काँग्रेस आणि भाजपच्या काळात देखील आम्ही भ्रष्टाचारा विरोधात लढलो. भ्रष्टाचाराला जात-पात पक्ष नसतो. ठराविक लोकांवरच धाडी टाकायचं आणि ब्लॅकमेल करून आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं काम भाजपचे आहे. हे धंदे बंद करावेत. लोकशाहीच्या दृष्टीने हे विकृत कृत्य आहे. असे राजू शेट्टी म्हणाले.सगळेच भ्रष्ट आहेत. भाजपमध्ये सगळे काशीला जाऊन पवित्र होऊन आलेले आहेत का? त्यांचे एकापेक्षा एक घोटाळे आहेत त्यांच्यावर का छापे पडत नाहीत. असा सवाल शेट्टी यांनी केला.

हेही वाचा-हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका

हेही वाचा- अंधश्रद्धेतून दहा दिवसांच्या बछड्याची केली शिकार, प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहे सरपंच

Last Updated : Oct 8, 2021, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.