कोल्हापूर - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.
गरीब लोकांच्या पोटाचा विचार करा-
बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. चंद्रकांत पाटील म्हणाले, बैठकीत सगळ्यात शेवटी निर्णय काही झाला नाही, पण मुख्यमंत्र्यांची भूमिका कडक लॉकडाऊनची आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांचा विचार केल्याशिवाय कोणता निर्णय घेऊ नये. कोरोनावर नियंत्रण आणता आणता गरीब लोकांच्या पोटाचा विचार करा. हातावर पोट असलेल्या नागरिकांना मदतीची माझी मागणी अजित पवार यांनी मान्य केली. सोमवारी याबाबत अजित पवार निर्णय घेऊ, असं म्हणाले.
नेमक्या उपाय योजना काय?-
चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हा आग्रह धरला आहे, की यामध्ये विविध घटकांचा आपण काय विचार करणार आहोत? किती दिवस हे सगळं चालणार आहे. यावरील नेमक्या उपाय योजना काय? अशी काही ठोस योजना तुम्ही मांडल्याशिवाय जर घाईघाईने लॉकडाउन केलं, तर त्याचा फार मोठा उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी बहुतेक हे मान्य केलं. त्यांचा कल कडक लॉकडाउनच्या दिशेने आहे. पण त्यांनी हे देखील मान्य केलं की अशी काही ठोस योजना बनवावी लागेल.
एक वर्षे कडक लॉकडाऊनने वाट लागली-
पैसे नाही म्हणता आणि आमदारांना 2 कोटी कसे देता, असा प्रश्न देखील पाटिल यांनी उपस्थीत केला. एका वेळी 700 कोटी वापरायला मिळतील. एक वर्षे कडक लॉकडाऊनने वाट लागली आता बॅलन्स साधला पाहिजे. 30 दिवसंपैकी 15 दिवस तरी त्यांचे दुकान सुरू राहतील, अस बघा, अशी सुचना पाटील यांनी केली आहे.
गरीब नागरिकांचा विचार न करता केलेल्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे. तात्याराव लहाने यांना बोलायला काय जातं. गरिबांची अवस्था काय होते ते पाहा. सरकारने गेल्या वर्षभरात सर्वसामान्य नागरिकांना एक रुपयांचं पॅकेज दिल नाही. मुंबईतील नगरसेवकांना आदित्य ठाकरे यांच्या सहीने 3 हजार कोटींचं सुशोभीकरण साठी पॅकेज दिलं. हा प्रकार मुलाचे हट्ट पुरवण्यासाठी केला का? तसेच महाराष्ट्राने आवश्यक नसलेल्या नागरिकांना लस दिली. कुणी कुणी चुकीच्या पद्धतीने लस घेतली याची चौकशी केली तर अनेकजण बिळात लपून बसतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा- जेव्हा द्रविड धोनीवर रागावतो, सेहवागने सांगितला पाकिस्तान दौऱ्यातील किस्सा