ETV Bharat / city

कोल्हापूर : मंदिरात बॉम्ब असल्याचा फोन करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Oct 8, 2021, 2:44 PM IST

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात घातपात होणार असल्याचा फोन गुरुवारी गोवा पणजीतील कंट्रोल रूमला आला होता. त्यानंतर तत्काळ खबरदारी घेत कोल्हापूर पोलिसांनी अंबाबाई मंदिराचा ताबा घेत तपासणी सुरू केली. घातपाताचा फोन आल्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची भांबेरी उडाली होती. अंबाबाई मंदिरात बॉम्ब शोध पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवून संपूर्ण मंदीर परिसर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद केले होते.

बॉम्ब असल्याचा फोन करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याचा निनावी फोन करणा करणाऱ्या दोघा व्यक्तींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. सासरा बाळासो करणे आणि जावई सुरेश लोंढे यांच्या काही तासातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी दारूच्या नशेत हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

हेही वाचा - अंबाबाई मंदिरात झाली घटस्थापना, नवरात्रोत्सवाला सुरुवात

मंदीर भाविकांसाठी केले होते बंद

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात घातपात होणार असल्याचा फोन गुरुवारी गोवा पणजीतील कंट्रोल रूमला आला होता. त्यानंतर तत्काळ खबरदारी घेत कोल्हापूर पोलिसांनी अंबाबाई मंदिराचा ताबा घेत तपासणी सुरू केली. घातपाताचा फोन आल्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची भांबेरी उडाली होती. अंबाबाई मंदिरात बॉम्ब शोध पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवून संपूर्ण मंदीर परिसर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद केले होते.

हातकणंगलेतील वडगावातून केला कॉल

तपासात कोणतीही बाब समोर आली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र हा निनावी फोन कोठून आला याची तांत्रिक माहिती काढत पोलिसांनी काही तासातच दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांनी मोबाइल नंबर ट्रेस करत या आरोपींचा माग काढला. त्यातील एका आरोपीने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील वडगाव या ठिकाणावरून कॉल केल्याचे तपासात पुढे आले.

हेही वाचा - घटस्थापनेच्या मुहूर्तावर अंबाबाई मंदिर भक्तांसाठी खुले.. ऑनलाइन बुकिंग असेल तरच मिळणार दर्शन

गुन्ह्याची कबुली

ज्या नंबरवरून कॉल केला तो फोन बाळासो कुरणे या व्यक्तीच्या नावावर आढळून आला. पण हा मोबाइल जावई सुरेश लोंढे वापरत होता. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी सासरा बाळासो कुरणे आणि जावई सुरेश लोंढे या दोघांना अटक केली. सुरेश लोंढे याला वडगावमधून तर सासरा बाळासो कुरणे याला सांगली जिल्ह्यातून अटक केली. त्यानंतर आरोपींना कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आणण्यात आले. या दोघांच्यावर राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.