नागपूर - शहरातील महिला व तरुणींच्या छेडखानीच्या घटना आणि काही टवाळखोर तरुणांचा त्रास बघता बंगळूर पोलिसांनी विशेष करून महिला व शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांचे पिंक पॅट्रोलिंग सुरू केले आहे. (Pink patrolling will be started in Nagpur) त्याच धर्तीवर नागपुराताही लवकरच पिंक पॅट्रोलिंग सुरू होणार आहे. (Commissioner of Police Amitesh Kumar) हा राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात होणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
दुचाकीलाही पिंक रंग देऊन त्या माध्यमातून ही पेट्रोलिंग केली जाणार
या माध्यमातून महिला पोलीस कर्मचारी पिंक रंगाच्या वाहनांमध्ये शहरातील विविध भागात खास करुन टवाळखोरांचे वास्तव्य असते. त्या भागात पेट्रोलिंग करणार आहे. तसेच, दुचाकीलाही पिंक रंग देऊन त्या माध्यमातून ही पेट्रोलिंग केली जाणार आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या अनेक घटना उघडकीस आले आहे.
महिलांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागेल
या सर्व पार्श्वभूमीवर कॉलेजचे तरुणींना सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलीस विभागाकडून हा उपक्रम राबवला जात आहे. चौका-चौकात येता-जाता मुलींवर शेरेबाजी करणाऱ्या टवाळखोरांना धडा शिकवला जाणार आहे. यात पिंक रंगांचे वाहन हे शहरात पेट्रोलिंग करत फिरणार असल्याने महिलांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस जाऊन गाव गुंडाबदल भीती निघण्यास मदत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
काय आहे 'पिंक पॅट्रोलिंग'
पोलीस विभागाने महिला पोलिसांसाठी गुलाबी रंगाचे सुसज्ज असे चारचाकी वाहन तयार केले आहे. त्या वाहनात तीन महिला कर्मचारी असतील. तर दुचाकींनासुद्धा गुलाबी रंग देण्यात आला आहे. वायरलेससह महिला कर्मचारी शहरात गस्त घालणार आहेत.
काय परिणाम दिसेल?
शाळकरी मुली, तरुणी, महिलांना संकटसमयी त्वरित मदत मिळवून देण्यासाठी पिंक पॅट्रोलिंग पथक तत्पर असेल. त्यामुळे टारगट युवकांचा त्रास किंवा पाठलाग करणाऱ्यांसह शेरेबाजी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पथक काम करेल. काही दिवसांतच याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
कुठे काम पिंक पॅट्रोलिंग
शहरातील शाळा-महाविद्यालये, शॉपिंग मॉल, मंदिरं, फुटाळा, अंबाझरी तलाव, महाल, सीताबर्डी बाजारपेठ यासारखे गजबजलेले परिसर, चित्रपटगृहे, शासकीय कार्यालये आणि शहरातील संवेदनशील ठिकाणांवर पिंक पॅट्रोलिंग करण्यात येईल.
शाळकरी मुली-तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलीस कटिबद्ध
पिंक पॅट्रोलिंगचा प्रस्ताव नागपूर पोलीस आयुक्तालयाकडून पाठवण्यात आला आहे. गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर उपराजधानीत पिंक पॅट्रोलिंग सुरू करण्यात येईल. शाळकरी मुली-तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलीस कटिबद्ध आहे असही अमितेश कुमार म्हणाले आहेत.
हेही वाचा - उत्तराखंडमध्ये कायदा अन् सुव्यवस्थेबाबत काहीही अडचण नाही - मुख्य निवडणूक अधिकारी