कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढच ( Rise in water level of Panchganga river ) होताना दिसत आहे. एकीकडे पावसाचा जोर कमी झाला असला तरी सद्यस्थितीत पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली ( Panchganga river crossed the danger level ) असून ती आता धोका पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. सध्याची पाणी पातळी 40.9 फुटांवर आहे. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले ( Radhanagari Dam ) असून त्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुर ( Flood in Kolhapur district ) येईल, अशी चिंता व्यक्त केली जात असून पावसाचा जोर कमी राहिल्यास हे संकट टळणार आहे.
हेही वाचा - Sambhajiraje Chhatrapati :'...त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने आता मराठा समाजासाठी कृती करावी'
कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद : कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर सुद्धा केर्ली येथे पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ( Kolhapur Ratnagiri route closed due to flood ) करण्यात आली आहे. केर्ली येथे बॅरिकेट लावण्यात आले असून जोतिबा मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 40.9 फुटांवर आहे. पंचगंगेची इशारा पातळी 43 फूट आहे. मात्र सकाळपासून केवळ दीड फूट पाणी वाढले आहे. त्यामुळे याच गतीने जर, पाणी वाढले तर धोका पातळीपर्यंत पोहोचायला अजूनही 10 ते 12 तास लागतील अशी शक्यता आहे. सध्या राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. 3, 4, 5, 6 नंबरचे दरवाजे उघडले असून चार दरवाज्यातून 5 हजार 712 क्यूसेक, पाॅवर हाऊसमधून 1 हजार 600 क्यूसेक असा एकूण 7 हजार 312 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
हेही वाचा - Sanjay Raut In Arthur Road Jail: शिवसेनेच्या नेत्यांना संजय राऊतांना भेटण्यास जेल प्रशासनाचा नकार