ETV Bharat / city

सीपीआरमध्ये 20 हजार लिटरची ऑक्सिजन टँक; 450 रुग्णांना दररोज पुरवठा करण्याची क्षमता - जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सीपीआरमध्ये तब्बल 20 हजार लिटरची ऑक्सिजन टँक बसविण्यात आली आहे. यामुळे आता दिवसाला 450 रुग्णांना ऑक्सिजनची सोय होणार असून शनिवारपर्यंत ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.

oxygen tank in kolhapur
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सीपीआरमध्ये तब्बल 20 हजार लिटरचा ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे.
author img

By

Published : Aug 19, 2020, 9:56 AM IST

Updated : Aug 19, 2020, 12:48 PM IST

कोल्हापूर - कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सीपीआरमध्ये तब्बल 20 हजार लिटरची ऑक्सिजन टँक बसविण्यात आली आहे. यामुळे आता दिवसाला 450 रुग्णांना ऑक्सिजनची सोय होणार असून शनिवारपर्यंत ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.

सीपीआरमध्ये 20 हजार लिटरची ऑक्सिजन टँक; 450 रुग्णांना दररोज पुरवठा करण्याची क्षमता
पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेत जिल्हा नियोजन समितीमधून टँक खरेदीला मंजुरी दिली होती. त्यानुसार तत्काळ ऑक्सिजन टँक बसविण्यात आली आहे. 30 फूट उंच, 2 मीटर व्यास असलेला या लिक्विड टँकसोबत 400 क्युबिक मीटर प्रतीतास क्षमतेचा वेपोरायझरही बसवण्यात आला आहे. 20 हजार लीटर क्षमतेची ही टँक असून यातील 1 लीटर द्रव्यापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे.

या टँकमधून सीपीआरमध्ये 15 ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. पाइपलाइनद्वारे रुग्णांच्या खाटांपर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चन्नई येथील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक प्रा.लि. कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागवला आहे. सध्या पाइप जोडणीचे काम सुरू असून शनिवारपर्यंत या टँकमधून ऑक्सिजन पुरवण्याची सुविधा कार्यान्वित होईल, असे डॉ.उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे यांनी सांगितले.

Last Updated : Aug 19, 2020, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.