ETV Bharat / city

Unique Garage In Kolhapur : या गॅरेजमध्ये "गतिमंद" कामगारांची "गती" बघून व्हाल हैराण, वाचा प्रेरणादायी कहाणी

आयुष्य जगण्याला निसर्गाकडून मिळाले दान विकलांग किंवा गतिमंद असले तरी आपल्या इच्छाशक्तीच्या पुढे ते जाऊ शत नाही. याचा प्रत्यय येतो बऱ्याचदा. आता हेच पाहा, कोल्हापूरात असे एक गॅरेज आहे जिथे केवळ गतिमंद तसेच विकलांग मुले काम करतात. एखाद्या धडधाकट व्यक्तीलाही लाजवतील अशी ते सर्व काम करतात. (Mentally Retarded Children News In Kolhapur ) त्यांचे काम पाहून त्या गॅरेजमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते. कुठे आहे हे गॅरेज आणि कोणी या गतिमंद तसेच विकलांग मुलांच्या आयुष्याला चाक लावली आहेत पाहुयात, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्ट मधून-

कोल्हापूर येथील गॅरेजमध्ये काम करत असलेल्या मुलांबद्दल खास स्टोरी

author img

By

Published : Feb 10, 2022, 12:40 PM IST

Updated : Feb 10, 2022, 8:07 PM IST

कोल्हापूर - आपण आजवर अनेक गॅरेज पाहिली असाल जिथे तुमची स्वतःची गाडी दुरुस्तीपासून सर्व्हिसिंगपर्यंत सगळी काम केली जातात. प्रत्येकवेळी आपण मेकॅनिक चांगला आहे की नाही पाहत असतो आणि जर काम आवडले नाही तर त्या गॅरेजमध्ये पुन्हा पाऊल सुद्धा ठेवत नाही. मात्र, कोल्हापूरात असे एक गॅरेज आहे जिथे केवळ गतिमंद तसेच विकलांग मुले काम करतात. एखाद्या धडधाकट व्यक्तीलाही लाजवतील अशी ते सर्व काम करतात. (Mentally Retarded Children News In Kolhapur ) त्यांचे काम पाहून त्या गॅरेजमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते. कुठे आहे हे गॅरेज आणि कोणी या गतिमंद तसेच विकलांग मुलांच्या आयुष्याला चाक लावली आहेत पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्ट मधून-

गतिमंद मुलांची प्रेरणादायी कहाणी

कोल्हापुरातल्या फुलवाडी मधलं अनोखं गॅरेज

कोल्हापुरातल्या फुलवाडी पहिल्या बस स्टॉप नजीक असलेल्या महेश सुतार यांच्या अफलातून गॅरेजची संपूर्ण कोल्हापूरात चर्चा आहे. त्याच कारण म्हणजे त्यांनी आपल्या गॅरेजमध्ये ज्यांना नोकरी दिली आहे ते सर्वजण विकलांग तसेच गतिमंद आहेत. (Mentally Retarded Children work) मात्र, गॅरेजमध्ये केवळ विकलांग मुलं काम करतात म्हणून याची चर्चा नाही तर, इथे येणारा प्रत्येक ग्राहक अगदी समाधानाने जातो तसेच गेल्या अनेक वर्षांपासून तो इथे आपली वाहने दुरुस्तीसाठी घेऊन येतो.

10 ते 12 मुलं काम करत आहेत

महेश सुतार यांनी हे गॅरेज सुरू केले त्याच्या मागे एक कारण आहे. गॅरेजचे मालक महेश सुतार स्वतः उच्चशिक्षित आहेत. ते पूर्वी एका ठिकाणी नोकरी सुद्धा करत होते. मात्र, यांचा स्वतःचा गतिमंद आहे त्याची चिंता सतावत होती. त्यांनी त्यालासुद्धा काहीतरी काम मिळावे जेणेकरून तो त्यामध्ये रमेल अशी त्यांची इच्छा होती. (mentally retarded children get jobs in this garage in Kolhapur) मात्र अनेकांना त्यांच्या भावाला नोकरी दिली नाही. शेवटी महेश सुतार यांनीच आपण काहीतरी करायचे ठरवून त्यामध्ये मतिमंद, विकलांग मुलांना प्रशिक्षण देऊन नोकरी द्यायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी काही वर्षांपूर्वी फुलेवाडी येथे गॅरेजची सुरूवात केली. सध्या त्यांच्याकडे 10 ते 12 मुलं काम करत आहेत. दुचाकी चारचाकी गाडीच्या सर्व्हिसिंगपासून, पंक्चर काढणे, टायर बदलणे, ऑईल बदलणे, किरकोळ दुरुस्ती आदी सर्व कामे ही मुलं अगदी मन लावून करत आहेत.

प्रवास कठीण होता मात्र हार मानली नाही

यावेळी बोलताना महेश सुतार म्हणाले, गतिमंद मुलांना गॅरेजमध्ये नोकरी तसेच त्यामध्ये गतिमंद मुले कोण पाठवतील का ? पाठवलीच तर त्यांना प्रशिक्षण देऊनही काम शक्य होईल का ? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर होते. मात्र मी आमच्याच परिसरात असलेल्या मुलांच्या पालकांची भेट घेतली. त्यांना याबाबत पटवून सांगितले. (Mentally Retarded Children News Work News) केवळ काम म्हणून याकडे न पाहता आपला मुलगा यामध्ये रमून जाईल शिवाय चार पैसेसुद्धा मिळतील हे त्यांना पटवून दिले त्यानंतर एक एक करत अनेक मुलं आजपर्यंत गॅरेज मध्ये काम करू लागली. सद्यस्थितीत 10 ते 12 जण काम करत असून अनेक गोष्टींमध्ये ते अतिशय उत्तमरीत्या तयार झाले आहेत.

ग्राहक सुद्धा समाधानी

विशेष म्हणजे या गॅरेजमध्ये अनेकजण गेल्या काही वर्षापासून सातत्याने येत आहेत. आजपर्यंत कोणत्याही पद्धतीने गाडी दुरुस्त केल्यानंतर बिघाड झाला नसून या मुलांच्या कामावर समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करतात. येथील डॉ. संदीप बाटेसुद्धा याबाबत बोलताना म्हणाले, अनेक दिवसांपासून मी या गॅरेजमध्ये गाडीची किरकोळ सर्व कामे करून घेत आहे. इथल्या गॅरेज मालकांचे विशेष कौतुक असून त्यांनी हा आगळा वेगळा विचार डोक्यात आणला हे उल्लेखनीय आहे. धडधाकट व्यक्तीही इतक्या चांगल्या पद्धतीने आणि काळजी घेऊन काम करू शकत नाही ते ही सर्व मुलं करतात असेही त्यांनी म्हटले.

गाडीमालकांचे नुकसान झाले मात्र कोणीही भरपाई मागितली नाही

मुलं जेंव्हा शिकत होती त्यावेळी काही किरकोळ नुकसानीच्या घटना घडल्या तेव्हासुद्धा अनेक ग्राहकांनी काहीही हरकत नाही म्हणत उलट नुकसान भरपाईसुद्धा नको म्हणत सुतार यांना आणखी प्रोत्साहन दिले. सद्या ही सर्व मुलं अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असून त्यांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे असे गॅरेज मालक महेश सुतार सांगतात.

मालक महेश सुतार मुलांची घेतात विशेष काळजी

गतिमंद तसेच या विकलांग मुलं कामावर येण्यापासून घरी जाईपर्यंत सर्व जबाबदारी गॅरेजचे मालक सुतार घेत असतात. त्यांच्यासाठी खास रिक्षा सुद्धा ठेवली असून त्यांना आणण्यापासून त्यांना सोडण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी उचलली आहे. काहीजण गॅरेजजवळच राहत असल्याने ते चालत घरी जातात. मात्र, नास्ता तसेच एकवेळ जेवणसुद्धा सुतार देत असतात असे त्यांनी म्हटले. त्यामुळे त्यांचे पालकसुद्धा आपला मुलगा काहीतरी काम करतो त्यामध्ये व्यस्त राहतो याचे समाधान वाटते असे सांगतात असेही त्यांनी म्हटले.

स्वतःच्या पायावर उभं राहून एकाने केलं लग्न

या गॅरेज मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या संभाजी दिवसे याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी सुद्धा झाली असल्याचे मालक सुतार सांगतात. मूकबधिर असूनही त्याने घरी हातावर हात न ठेवता येथे येऊन काम करायचे ठरवले होते. गेल्या काही वर्षांपासून तो इथे काम करत असून मन लावून तो आपली कामे करतो शिवाय त्याला संपूर्ण व्यावहारिक ज्ञान मिळाले आहे. त्यामुळे सध्या तो स्वतःच्या पायावर उभा आहे असेही मालक महेश सुतार यांनी म्हटले.

धडधाकट मुलांनो यांचा आदर्श घ्या

नागरिकांना तसेच तरुण मुलांना आवाहन करताना मालक महेश सुतार सांगतात, अनेक तरुण नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतात, शिवाय चुकीच्या मार्गाला जाऊन चोरी करणे, दरोडा घालणे आदी काम करतात. त्यांनी एकदा या मुलांकडे पाहून यांच्यातील ऊर्जा आणि काम करण्याची असलेली जिद्द पहावी. जर गतिमंद मुलं आपल्या पायावर उभे राहू शकतात तर मग धडधाकट असूनही आपल्याला का शक्य होणार नाही असेही म्हणत त्यांनी समाजाला संदेश दिला.

अनेक व्यवसायिकांनी अशाप्रकारे शक्य तितक्या मुलांना नोकरी द्यावी

आपल्याला शक्य झाले त्यानुसार 10 ते 12 मुलांना मी प्रशिक्षण देऊन नोकरी दिली आहे. समाजातील अनेक व्यावसायिक आहेत जिथे गतिमंद तसेच विकलांग मुलांना त्यांच्या कुवतीप्रमाणे काम देऊ शकतो. त्या सर्व ठिकाणी व्यावसायिकांनी पुढे येऊन काम देणे गरजेचे आहे. त्यामुळे नक्कीच एक वेगळे सर्वत्र पाहायला मिळेल असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Sheena Bora Case : इंद्राणी मुखर्जीची सर्वोच्च न्यायालयात धाव

Last Updated : Feb 10, 2022, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.