कोल्हापूर - शहरात पावसाचा जोर ओसरल्यामुळे महापुराचे संकट जवळपास टळले आहे. मात्र, कोरोनाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज तब्बल 1 हजार 14 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 9 हजार 991 इतकी झाली आहे.
शनिवारी सायंकाळी प्राप्त आकडेवारीनुसार, जिल्ह्यात दिवसभरात 170 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 9 हजार 991 रुग्णांपैकी 4 हजार 121 रुग्ण बरे झाले असून 261 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 609 वर पोहोचली आहे.
शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1 हजार 14 पॉझिटिव्ह अहवालांमध्ये
आजरा-11
भुदरगड- 8
चंदगड-9
गडहिंग्लज-21
गगनबावडा-1
हातकणंगले-153
कागल-41
करवीर-106
पन्हाळा-35
राधानगरी-12
शिरोळ-50
नगरपालिका क्षेत्र- 230
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 312 इतर जिल्हा व राज्यातील-13 रुग्णांचा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 200
भुदरगड- 253
चंदगड- 414
गडहिंग्लज- 305
गगनबावडा- 30
हातकणंगले- 961
कागल- 199
करवीर- 1068
पन्हाळा- 371
राधानगरी- 312
शाहूवाडी- 336
शिरोळ- 395
नगरपरिषद क्षेत्र- 2083
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-2931 असे एकूण 9840 आणि इतर जिल्हा व राज्यातील 151 असे मिळून एकूण रुग्णांची संख्या 9991 इतकी झाली आहे.