ETV Bharat / city

माजगावातील अवैध उत्खननाची चौकशी करा अन्यथा आत्मदहन, शेतकऱ्याचा इशारा

राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या सामाईक शेतीमधील अवैध उत्खनन करुन शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याची घटना घडली आहे. संबंधित शेतकरी विलास शाहू पाटील यांनी या घटनेची सखोल चौकशी करून या प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि राधानगरी पोलीस स्टेशनला पाठवल्या आहेत.

कोल्हापुरातील माजगावात अवैध उत्खननाबाबत चौकशी करा

author img

By

Published : Apr 30, 2021, 5:46 PM IST

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या सामाईक शेतीमधील अवैध उत्खनन करुन शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याची घटना घडली आहे. संबंधित शेतकरी विलास शाहू पाटील यांनी या घटनेची सखोल चौकशी करून या प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि राधानगरी पोलीस स्टेशनला पाठवल्या आहेत.

'अन्यथा शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा'

'आठवडाभरात आत्मदहनाचा इशारा'

माजगाव इथे गट नं. ३९२मध्ये विलास शाहू पाटील, शंकर शंभू पाटील, संजय आण्णा पाटील आणि अशोक केशव पाटील यांची सामाईक हिस्सेदार ८१ गुंठे जमीन आहे. यामध्ये फक्त अशोक केशव पाटील यांच्याच संमतीने ८१ गुंठे क्षेत्रात त्रिवेणी कन्स्ट्रक्शन बोरवडे यांनी माजगाव रस्त्यासाठी दररोज ५०० ट्रॉली असे दहा दिवस पाच हजार ट्रॉली मुरुमाचे उत्खनन केले आहे. याबाबतची लेखी तक्रार विलास पाटील यांनी राधानगरी तहसीलदार यांना दिली होती. या तक्रारीवरून कसबा वाळवे मंडल अधिकारी विशांत भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, पाच हजार ट्रॉलींपेक्षा अधिक उत्खनन होऊनही संबंधितांकडून लाच घेऊन कमी उत्खनन दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच आपल्या शेतीचे नुकसान झाल्याचे निवेदनाद्वारे म्हटले आहे. या अवैध उत्खननाची सखोल चौकशी करून उत्खनन थांबवावे आणि संबंधित लोक आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आपल्याला न्याय मिळावा, अन्यथा पुढील आठवड्यात तहसीलदार कार्यालय परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा विलास शाहू पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण लांबणीवर; केवळ ज्येष्ठ नागरिकांचे होणार लसीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.