कोल्हापूर साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होत असतो. कोरोनामुळे दोन वर्षे नागरिकांना अनेक बंधने होती. मात्र आता कोणत्याही निर्बंधाशिवाय यावर्षी नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे यावर्षी देवस्थान समितीने सुद्धा जोरदार तयारी केली आहे. मंदिर स्वच्छतेच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली असून दोन दिवसांत आणखी लगबग सुरू होणार आहे. याबाबतच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांच्याशी बातचीत करून सविस्तर आढावा घेतला आहे.
नवरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने दानपेटी उघडुन पैशांची मोजदाद सुरू करण्यात आली आहे. यासाठी जवळपास देवस्थान व्यवस्थापन समितीचे 30 पेक्षा अधिक कर्मचारी ही मोजदाद करत आहे. या दान पेटीमध्ये 2 हजार, 500, 200,100, 50, 10 रुपये या नोटांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच काही सोन्या चांदीचे दागिन्याचा समावेश आहे. अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यातील पहिली पेटी आज उघडण्यात आले अंबाबाई मंदिरातील गरुड म्हणतात मोजदाद करण्यात येत आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीनचा देखील वापर करण्यात आला आहे.
पहिली दानपेटी उघडली दरवर्षी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात येत असतात. तर भक्तांकडून नवस श्रद्धा आणि सेवेकरिता अशा विविध कारणासाठी मंदिरातील दक्षिणा पेटीत भरभरून दान करण्यात येत असते. दरम्यान येत्या 15 ते 20 दिवसांवर नवरात्रोत्सव येवून ठेपला असल्याने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रीत होणारी गर्दी पाहता आणि भाविकांकडून देण्यात येणारी देणगी पाहता देवस्थान समितीकडून आज दानपेट्या उघडण्यात आल्या आहेत. या दानपेट्यातील रोख रक्कम आणि सोने चांदीचे मोजण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दानपेट्यात दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण जास्त आहे. मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून या नोटा मोजून बंडल करून ठेवायचे काम सुरू करण्यात आले आहे. अंबाबाई मंदिर आणि परिसरात एकूण 12 दानपेट्या आहेत. यापैकी आज पाहिली दानपेठी उघडण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू गेल्या 2 वर्ष कोरोना संसर्गामुळे सर्व सण उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे गेल्या नवरात्र काळात करवीर निवासी अंबाबाई मंदिरात भाविकांना बाहेरच साहित्य आतमध्ये नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. सोबतच दर्शनासाठी ई पासची सुविधा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र यंदा निर्बंध मुक्त सण उत्सव साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरे झाले. यानंतर आता शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होणार आहे. यामुळे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असून ही गर्दी लक्षात घेता मध्य प्रशासनाच्या वतीने देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.