ETV Bharat / city

Stone Pelting At Chitra Wagh Rally : भाजपच्या कार्यकर्त्यानेच चित्रा वाघ यांच्या सभेत दगडफेक केल्याचा महाविकास आघाडीचा संशय

चित्रा वाघ यांच्या सभेवर झालेल्या दगडफेक प्रकरणी ( Stone Pelting At Chitra Wagh Rally ) महविकास आघाडीच्या महिला ( Mahavikas Aghadi ) कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना भेटून सखोल चौकशी आणि तपास करण्याचे निवेदन त्यांना दिले होते. तर त्यात त्यांनी ही दगडफेक भाजपच्या समीर शेट ( Samir Shete ) यांनी घडवून आणल्याचा संशय असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप संभाषण तपासावे, असे पोलिसांना सांगितले आहे.

Mahavikas Aghadi Stone Pelting Alligation

author img

By

Published : Apr 4, 2022, 11:00 PM IST

कोल्हापूर - भाजपा नेत्या चित्रा वाघ ( Stone Pelting At Chitra Wagh Rally ) हे गेल्या 2 दिवसांपासून सत्यजीत कदम ( Satyajit Kadam ) यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरात दाखल झाले आहेत. रोज निरनिराळ्या ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. मात्र, काल रविवारी सैनिक वसाहतीतील सभेत विरोधी पक्षाकडून दगडफेक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पालकमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांच्यावर ही निशाणा साधला आहे. मात्र, ही दगडफेक भाजपनेच केलेली असून हा स्टेज फिक्सिंगचा प्रकार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले होते. या सर्वावर महविकास आघाडीच्या महिला ( Mahavikas Aghadi ) कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना भेटून सखोल चौकशी आणि तपास करण्याचे निवेदन त्यांना दिले होते. तर त्यात त्यांनी ही दगडफेक भाजपच्या समीर शेट ( Samir Shete ) यांनी घडवून आणल्याचा संशय असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप संभाषण तपासावे, असे पोलिसांना सांगितले आहे.

प्रतिक्रिया

भाजपच्या समीर शेठ यांनी घडवून आणल्याचा संशय - मुक्त सैनिक वसाहत येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेत झालेल्या दगडफेकीचा त्यांनी निषेध नोंदवत गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. मात्र, महविकास आघाडी सरकारच्या महिला कार्यकर्त्यांनी आज पोलीस अधीक्षकांना पत्र देत ही दगडफेक भाजपनेच घडवून आणल्याचे आरोप केले आहेत. ही दगडफेक समीर शेठ यांनी घडवून आणल्याच्या संशय व्यक्त केला असून याबाबत त्यांची चौकशी करावी आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप संभाषण तपासून पाहावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सभा झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असे निवेदनातून म्हटले आहे.

सहानुभूती मिळवण्यासाठी दगडफेकीचा प्रकार - माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरात काही दिवसांपूर्वी महिलांबाबत अवमान कारक वक्तव्य केलं होते. त्याबद्दल समजातून तिव्र प्रतिक्रीया उमटली होती. याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून निषेध ही नोंदवण्यात आला होता. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा 'कोणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्य करु नयेत' अशा आशयाचे ट्वीट केले होते. यामुळे त्यांना पक्षातून विचारणा होताच त्यांनी यू टर्न घेतला आहे. तसेच महिलांमध्ये भाजपबद्दल असंतोष पसरल्याचे लक्षात आल्यानेच सहानुभूती मिळविण्यासाठी दगडफेकीचा हा प्रकार घडवून आणण्यात आला असल्याचे महाविकास आघाडीच्या महिलांनी त्या पत्रात म्हणाले आहे.

हेही वाचा - Adar Poonawalla Pune : 'कोरोनाची चौथी लाट आली, तर ती सौम्य असेल'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.