कोल्हापूर - कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकरने अगदी लहान वयात पाहिलेले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्ण करून ती शहरात दाखल झाली आहे. जगातील सर्वात उंच आणि तितकेच अवघड असणारे माऊंट एव्हरेस्ट ( Kasturi Savekar Mount Everest ) तिने सर केले आहे. या कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशभरात झाले. खडतर प्रवासानंतर कस्तुरीचे कोल्हापूरकरांनी मोठ्या जल्लोषात ( Kasturi welcomed in Kolhapur ) स्वागत केले. छत्रपती ताराराणी चौकातून ( Chhatrapati Tararani Chowk ) कस्तुरीची ओपन जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान तिने माध्यमांशी बोलताना ही मोहीम राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष कृतज्ञता पर्वास अर्पण करत असल्याचे सांगितले.
असा केला कस्तुरीने एव्हरेस्ट सर : कस्तुरीने माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानुसार तिला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अगोदर अन्नपूर्णा शिखर सर केले. त्यानंतर कस्तुरी ४ मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचली. ९ मे रोजी रात्री ९ वाजता एव्हरेस्टच्या चढाईला सुरुवात केली. १० मे रोजी दुपारी कॅम्प २ वर पोहोचली. त्या ठिकाणी दोन दिवस थांबून १२ मे रोजी कॅम्प ३ वर पोहोचली. १३ मे रोजी दुपारी कॅम्प ४ वर पोहोचली. तेथे थोडी विश्रांती घेऊन रात्री ७ वाजता तिने फायनल समिट पुशला सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण रात्र चालून १४ मे रोजी सकाळी ६ वाजता तिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा आणि करवीर नगरीचा भगवा ध्वज फडकवला. ही कामगिरी करणारी ती कोल्हापूरची पहिलीच व्यक्ती ठरली. यानंतर परत येताना तिला बऱ्याच आर्थिकसह अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. मात्र सर्वांवर मात करत ती कोल्हापुरात दाखल झाली.
हेही वाचा - ही पोरगी करणार स्वतःशीच लग्न, पाहा क्षमा बिंदूचे बिनधास्त फोटो