ETV Bharat / city

Minister Hasan Mushrif On BJP : चंद्रकांत पाटील यांनी हळवा होण्याची गरज नाही - मंत्री हसन मुश्रीफ - मंत्री मुश्रीफ यांची टीका

महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना वाईन उत्पादनामुळे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे राज्य सरकारने वाईनबाबत निर्णय घेतले असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मध्य प्रदेशात घरोघरी वाईन वाटप केली जाते याबाबत भाजप नेते गप्प का आहेत, असा सवालही यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी ( Minister Hasan Mushrif On BJP ) उपस्थित केला.

मंत्री मुश्रीफ
मंत्री मुश्रीफ
author img

By

Published : Jan 29, 2022, 1:56 PM IST

कोल्हापूर - शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेत राष्ट्रवादी शिवसेनेला खाऊन टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तर त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Minister Hasan Mushrif ) यांनी चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे वस्तुस्थिती पाहून बोलत नाहीत, असे म्हणत शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना आम्ही पक्षात घेतले नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची ये-जा चालू असते. ताटात काय आणि वाटीत काय सर्व एकच आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी इतका हळवा होण्याची गरज नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

द्राक्ष उत्पादकांसाठी वाईबाबत निर्णय - तसेच राज्य शासनाने वाईनबाबत ( Wine At Supermarket ) घेतलेल्या निर्णयाचे हसन मुश्रीफ यांनी स्वागत केले आहे. वाईन उत्पादनामुळे द्राक्ष उत्पादकांना चांगले पैसे मिळतील या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्याच्या महसुलातही वाढ होईल. यामुळे यास विरोध करायचे काही कारण नाही. दारूबंदी प्रबोधन करूनच झाली पाहिजे यासाठी लोकांनी मनावर घेतले पाहिजे. दारुबंदीसाठी सर्व पक्षांनी प्रबोधन करण्याची गरज असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. ते आज (दि. 29 जानेवारी) कोल्हापुरात ( Kolhapur ) पत्रकारांशी बोलत होते.

मध्यप्रदेशमध्ये घराघरात वाईन वाटली जाते यावर भाजप नेते का नाही बोलत - राज्य सरकारने किराणा दुकान व सुपर बाजार ( Wine At Supermarket ) येथे वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपने याला तीव्र विरोध करत टीकेची झोड उठवलेली आहे. यावर मुश्रीफ म्हणाले, मध्यप्रदेशात घरोघरी वाईन वाटली जाते. यावर भाजप नेते काही का बोलत नाही, असा सवालही ( Minister Hasan Mushrif On BJP ) त्यांनी उपस्थित केला आहे.

निलंबित आमदारांबाबात विधानभवन सचिवालय ठरवेल - मागी अनेक महिन्यांपासून विधान परिषदेच्या बारा आमदारांबाबत राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकारडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, यावर राज्यपाल अद्याप निर्णय घेत नाहीत. निलंबित बारा आमदारांबाबत ( Suspended MLA ) न्यायालयाकडून कोणताच निर्णय अद्याप आलेला नाही. न्यायालयाचे आदेश आल्यानंतर विधानभवन सचिवालय त्याबाबत ठरवेल, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

मास्कमुक्त महाराष्ट्र इतक्यात तरी होणार नाही - अमेरिका फ्रान्स मध्ये कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर मास्क मुक्त करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत चर्चा करण्यात आली. टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार यावर निर्णय घेण्यात येईल. मात्र, सध्याची कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहता, मास्कमुक्त महाराष्ट्र इतक्यात तरी होणार नाही, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा - Chandrakant Patil On Mahavikas Aghadi : "शेतकऱ्यांच्या पोरांना दारूच्या नादी लावायचे आहे का?"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.