ETV Bharat / city

कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी सबुरीने घ्यावे; ग्रामविकास मंत्री मुश्रीफांनी जोडले हात - कोल्हापूर व्यापारी बातमी

कोल्हापूर जिल्ह्यातील जोपर्यंत 70 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत व्यापार्‍यांनी सहकार्य करावे, असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यापाऱ्यांना हात जोडले.

Minister Hasan Mushrif
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
author img

By

Published : Jul 9, 2021, 6:43 PM IST

Updated : Jul 9, 2021, 7:40 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील ७० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. राज्याला एक नियम व जिल्ह्याला एक नियम असे होणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सबुरी घ्यावे, असे म्हणत आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हात जोडले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रतिक्रिया देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

हेही वाचा - क्रूरतेची परिसीमा.. तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या चिमुकलीला खाडीत जिवंत पुरले

पुढे मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेट आजही 12 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आजही आपण चौथ्या फेजमध्ये आहोत. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यांनी काही दिवस मुदत दिली. कोल्हापुरातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी केला पाहिजे. राज्याला एक नियम आणि कोल्हापूर जिल्ह्याला एक नियम असे होणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सबुरीने घेणे गरजेचे आहे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

कोरोनासोबत अन्य रोगाचा प्रसार देखील होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जोपर्यंत 70 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत व्यापार्‍यांनी सहकार्य करावे, असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यापाऱ्यांना हात जोडले.

  • पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाच दिवसांसाठी नियम शिथिल करण्याची मागणी केली होती

व्यापाराची आर्थिक नुकसान लक्षात घेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या मागणीनंतर कोल्हापूर शहरातील व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच दिवसांसाठी नियम शिथिल केले होते. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट बारा टक्के असल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यातील परवानगी नसलेले व्यवसाय बंद राहणार आहे.

  • तर व्यापारी रस्त्यावर उतरतील

गेल्या दीड वर्षांपासून व्यवसाय नाही. अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यापूर्वी दोनवेळा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला होता. मात्र, पुन्हा एकदा व्यवसाय बंद होत असल्याने व्यापारी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Pankaja Munde : ...अन् वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या

Last Updated : Jul 9, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.