ETV Bharat / city

Kolhapur Trees Felled : सह्याद्री व्याघ्रप्रकल्प परिसरात लाखो वृक्षांची कत्तल; वनविभागाची कारवाई - सह्याद्री व्याघप्रकल्प

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पा लगत असलेल्या शाहुवाडीतील उदगिरी, इनामदारवाडी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याची ( Kolhapur Forest department shahuvadi action ) गंभीर बाब समोर आली आहे. इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये जवळपास 10 ते 12 ट्रकांमध्ये बसेल इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ( Kolhapur Trees Felled) झाली आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत कारवाई ( Kolhapur Forest department action ) केली.

Kolhapur Trees Felled
कोल्हापुरात बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाई
author img

By

Published : Mar 21, 2022, 1:15 PM IST

Updated : Mar 21, 2022, 1:30 PM IST

कोल्हापूर - सह्याद्री व्याघ्रप्रकल्पा लगत असलेल्या शाहुवाडीतील उदगिरी, इनामदारवाडी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याची ( Kolhapur Forest department shahuvadi action ) गंभीर बाब समोर आली आहे. इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये जवळपास 10 ते 12 ट्रकांमध्ये बसेल इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ( Kolhapur Trees Felled) झाली आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत कारवाई ( Kolhapur Forest department action ) केली. या घटनेनंतर वृक्षप्रेमी चांगलेच संतापले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सह्याद्री व्याघ्रप्रकल्प परिसरात लाखो वृक्षांची कत्तल

जवळपास 10 ते 12 ट्रकभरतील ऐवढी वृक्षतोड -

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी इनामदारवाडी येथे मोठी वृक्षतोड सुरू आहे. अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना त्यांच्या खबरी कडून मिळाली होती. त्यांनी वृक्षतोड झालेला हा संपूर्ण भाग इको सेनेसीटीव्ह झोन तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या प्रादेशिक वन विभागातील क्षेत्र असल्याने तात्काळ मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर एम. रामनुजम, उपवनसंरक्षक आर.आर.काळे, तथा वनक्षेत्रपाल अमित भोसले यांना त्याबाबत माहिती दिली. त्यांनी मिळालेल्या या गुप्त माहितीवरून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या उदगिरी-इनामदारवाडी नजीक गट नं 302 आणि 303 येथील बेकायदेशीर वृक्षतोडीवर छापा टाकला. वनक्षेत्रपाल अमित भोसले आणि त्यांचे वनपाल तसेच इतर वनरक्षकांची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी त्यांना जवळपास 10 ते 12 ट्रक लाकूड हे आढळून आले. रात्री उशीरा पर्यंत पंचनामा सुरू होता.

Kolhapur Trees Felled
सह्याद्री व्याघ्रप्रकल्प परिसरात लाखो वृक्षांची कत्तल

वृक्ष तोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे व कठोर कारवाई करावी -

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशेजारी झालेल्या या बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे निसर्गाची मोठी हानी झालेली आहे. लवकरात लवकर ही वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केली आहे.

हेही वाचा - IMRAN KHAN ON INDIA : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले भारताचे कौतुक

Last Updated : Mar 21, 2022, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.