ETV Bharat / city

लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला..! भर पावसात मराठा आंदोलक कोल्हापुरात दाखल

छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे रणशिंग फुकण्यात आले आहे. यामध्ये सर्वच नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन आपली भूमिका मांडायची आहे. बुधवारी शाहू समाधीस्थळापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असून नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि कोकण मध्ये पाहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहेत. दरम्यान, आजच्या मूक आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला
लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला
author img

By

Published : Jun 16, 2021, 10:25 AM IST

Updated : Jun 16, 2021, 11:27 AM IST

कोल्हापूर - मराठा आरक्षणासंदर्भात आज(बुधवारी) कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मात्र, आज सकाळापासूनच आंदोलनस्थळी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तरीही भर पावसातसुद्धा मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळी दाखल झाले आहेत. या संदर्भातच मराठा समाजातील समन्वयकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला..!
लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला..!

छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाचे रणशिंग फुकण्यात आले आहे. यामध्ये सर्वच नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन आपली भूमिका मांडायची आहे. बुधवारी शाहू समाधीस्थळापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असून नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि कोकण मध्ये पाहिल्या टप्प्यात आंदोलने होणार आहेत. दरम्यान, आजच्या मूक आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला..!

मूक आंदोलन असणार आहे. यामाध्यमातून राजकारण्यांना बोलते करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीची आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका आहे. हे जनतेपुढे स्पष्ट होणार असल्याचे मत या ठिकाणी आलेल्या आंदोलकांने व्यक्त केले आहे.

महाऱाष्ट्रातील कोणत्याच राजकीय पक्षाला मराठा समाजाला आरक्षण न देण्याची भूमिका होती. मात्र, या आंदोलनात आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे त्यासाठी आता या ठिकाणी येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

Last Updated : Jun 16, 2021, 11:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.