कोल्हापूर - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 7 एप्रिल रोजी चैत्र यात्रा होणार होती. मात्र ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून करवीर निवासीन श्री अंबाबाई मंदिर आणि दक्खनचा राजा जोतीबाचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहेत. सर्वच धार्मिक स्थळेसुद्धा दर्शनासाठी बंद करण्याचा प्रशासनानाने निर्णय घेतला आहे.
केवळ मंदिर समितीतील लोकांच्या उपस्थित दररोजची पूजापाठ पार पडणार आहे. मशीद आणि चर्चमध्येसुद्धा प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने नागरिक जमत असतात. यावरसुद्धा अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती; विविध धार्मिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.