कोल्हापूर : आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान (Voting For Rajya Sabha Elections) होत आहे. यामध्ये भाजप तसेच महाविकास आघाडी दोन्हीकडून आपले सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा केला जात आहे. दोघांनाही एका-एका मताची आवश्यकता आहे. असे असताना आपल्याला संपर्कसुद्धा करायचे धाडस कोणी केलं नसल्याचे जनस्वराज्य पक्षाचे नेते, आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी म्हटले आहे. त्यांनी काल रात्री उशिरा ही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते मुंबईला रवाना झाले.
विनय कोरे नेमकं काय म्हणाले पाहूयात : विनय कोरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, मी सुरुवातीलाच माझी भूमिका जाहीर केली आहे. भाजपला पाठिंबा मी 2019 च्या निवडणुकीनंतरच दिला आहे. सातत्याने भूमिका बदलणारी आम्ही मंडळी नाही. त्यामुळे माझी तीच भूमिका असणार असल्याचे कोरे यांनी म्हटले. शिवाय सर्वच पक्षांना माहिती आहे. एखादा निर्णय घेतला म्हणजे त्यात मी बदल करीत नाही. त्यामुळे मला संपर्क साधण्याचेसुद्धा धाडस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले नाही, असेही कोरे म्हणाले.