कोल्हापूर - अंबाबाईच्या भक्तांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण अंबाबाईच्या दर्शनाच्या वेळेत आता वाढ करण्यात आली आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत मिळणारे दर्शन आता सकाळी 7 ते 12 या वेळेत मिळणार आहे. तर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुद्धा भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला असून एकाच वेळी गर्दी होऊ नये, शिवाय दर्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी दर्शनाची वेळ वाढवण्यात आले आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अंबाबाईच्या भक्तांना आनंदाची बातमी; दर्शनाची वेळ वाढवली, ई पास सुद्धा मिळणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चनंतर बंद करण्यात आलेली मंदिरे दिवाळी पाडव्याला उघडण्यात आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक नियमावली लागू करत दर्शनासाठी परवानगी दिली आहे. अनेक दिवासांपासून मंदिरे बंद असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. त्याचाच विचारकरत कोरोना नियमांचे पालन करत अंबाबाई मंदिरसमितीने दर्शनाच्या वेळत वाढ केली आहे.