ETV Bharat / city

गोकुळ दूध संघ निवडणूक : मुश्रीफ-पाटील गटाचा 17 जागांवर विजय, महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान

author img

By

Published : May 4, 2021, 6:42 AM IST

Updated : May 4, 2021, 10:17 PM IST

गोकुळ दूध संघ निवडणूक; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात
LIVE UPDATES : गोकुळ दूध संघ निवडणूक; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

18:40 May 04

पाटील-मुश्रीफ गटाची 13 जागांवर आघाडी, सत्ताधारी गटाची 3 जागांवर आघाडी

चौथ्या फेरीअखेर विरोधी गट म्हणजेच पाटील-मुश्रीफ गटाने 13 जागांवर आघाडी राखली आहे तर सत्ताधारी म्हणजेच महाडिक गटाने 3 जागांवर आघाडी घेतली आहे. 

16:40 May 04

पहिल्या फेरीत पाटील-मुश्रीफ गटाची सर्व जागांवर आघाडी

विरोधी आघाडी पहिल्या फेरीत सर्वच 16 जागांवर आघाडीवर असून सुमारे 20 ते 30 मतांची आघाडी घेतली आहे. 

15:19 May 04

16 जागांसाठी सुरू मतमोजणी, 33 उमेदवार होते रिंगणात

गोकुळच्या राखीव प्रवर्गातील 5 पैकी 4 जागांवर विरोधी पाटील, मुश्रीफ गटाचा विजय झाला असूनन सत्ताधारी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 16 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे, या 16 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात उतरले होते. 

10:51 May 04

प्रवर्ग निहाय मतपत्रिकांच वर्गीकरण पूर्ण, आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात

राखीव प्रवर्गातील एकूण 5 पैकी विरोधी बंटी पाटील, मुश्रीफ गटाचे 4 उमेदवार विजयी

प्रवर्ग निहाय मतपत्रिकांच वर्गीकरण पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होणार आहे. सर्वात आधी आरक्षित पाच जागांची मतमोजणी केली जाणार आहे. लवकरच पहिला निकाल हाती येणार आहे. पहिला कल कुणाला मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

10:29 May 04

मतपेट्यातून प्रत्येक टेबलवर मतपत्रिका बाहेर काढण्यात आल्या

गोकुळ निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. मतपेट्यांतून प्रत्येक टेबलवर मतपत्रिका बाहेर काढण्यात आल्या आहेत. आता या मतांची मोजणी सुरू केली जाईल. मतपत्रिकांची प्रवर्गानुसार विभागणीही सुरू झाली आहे.

09:28 May 04

मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर केंद्राबाहेर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

08:18 May 04

उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडली..

उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडली

ज्या ठिकाणी मतपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या ती स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली आहे. उमेदवारांच्या उपस्थितीत ही रूम उघडण्यात आली.

06:35 May 04

गोकुळ दूध संघ निवडणूक : मुश्रीफ-पाटील गटाचा 17 जागांवर विजय, महाडिक गटाला केवळ 4 जागांवर समाधान

मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे

कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी आठ वाजल्यापासून म्हणजेच थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 18 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया सुरू राहणार असून दुपारी दोनपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रतिनिधी व पत्रकरांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी यापूर्वीच बंधनकारक करण्यात आली आहे.

मतमोजणीकडे जिल्हावासियांचे लक्ष

कोल्हापूर जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 2 मे) मतदान झाले. एकूण 70 मतदान केंद्रांवर मतदान झाले. या मतदानामध्ये तब्बल सात तालुक्यात केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले तर एकूण सरासरी मतदान 98.78 टक्के झाले. गोकुळच्या इतिहासात आत्तापर्यंत सर्वात चर्चेची ठरलेली ही निवडणूक आहे. आज मतमोजणी होणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू आघाडी समोर पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत जोरदार असे आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

शासकीय हॉलमध्ये मतमोजणी

कोल्हापुरातील रमणमळा येथील शासकीय हॉलमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल त्यासाठी 18 टेबल ठेवण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

99 टक्के मतदान

गोकुळ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 तालुक्यांत एकूण 3 हजार 647 इतके मतदार होते. त्यातील 3 हजार 639 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 887 महिला तर 2 हजार 752 पुरुष मतदार होते. जिल्ह्यात एकूण 99.78 टक्के इतके मतदान झाले.

Last Updated : May 4, 2021, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.