ETV Bharat / city

Lata Mangeshkar Kolhapur Relation : लता मंगेशकरांचे कोल्हापूरशी होते खास नाते, यादव कुटुंबियांनी सांगितल्या आठवणी - कोल्हापूर यादव कुटुंब लता मंगेशकर आठवणी

लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 93व्या वर्षी ( Lata Mangeshkar Passes Away ) निधन झाले. मंगेशकर कुटुंब आणि कोल्हापूर ( Lata Mangeshkar Relation With Kolhapur ) याचे एक नाही, तर अनेक खास संबंध राहिले आहेत. आता त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींनादेखील उजाळा मिळत आहे. कोल्हापुरातील यादव कुटुंब आणि कारेकर कुटुंबाकडे ( Kolhapur Yadav And Karekar Family Relation With Lata Mangeshkar ) त्यांच्या खास आठवणी आहेत.

Lata Mangeshkar Special Relation With Kolhapur

author img

By

Published : Feb 6, 2022, 5:25 PM IST

Updated : Feb 6, 2022, 5:45 PM IST

कोल्हापूर - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 93व्या वर्षी ( Lata Mangeshkar Passes Away ) निधन झाले. ते गेल्या एक महिन्यापासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान काल त्यांची तब्येत अचानक खालावली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने अनेक स्तरातून दुःख व्यक्त होत आहे. दरम्यान, मंगेशकर कुटुंब आणि कोल्हापूर ( Lata Mangeshkar Relation With Kolhapur ) याचे एक नाही, तर अनेक खास संबंध राहिले आहेत. आता त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींनादेखील उजाळा मिळत आहे. कोल्हापुरातील यादव कुटुंब आणि कारेकर कुटुंबाकडे ( Kolhapur Yadav And Karekar Family Relation With Lata Mangeshkar ) त्यांच्या खास आठवणी आहेत.

प्रतिक्रिया

यादव-मंगेशकर कुटुंबाशी खास संबंध -

मुळचे सांगलीचे असलेले मंगेशकर कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपूर्वी कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे भाड्याच्या घरात राहण्यासाठी होते. ते दहा वर्ष इथे राहिले. कोल्हापुरातील लक्ष्मण कारेकर यांच्या घरी अवघ्या दहा रुपयाच्या भाड्यावर हे मंगेशकर कुटुंबीय राहत होते. तीन खोल्यांच्या या छोटेखानी भाड्याच्या घरात लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर , हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे बालपण गेले आहे. त्यावेळी आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबियांना कारेकर कुटुंबियांनी वेळोवेळी मदत ही केली होती. तर कोल्हापुरातील यादव कुटुंबीय यांच्याशी ही मंगेशकर कुटुंबाशी खास संबंध होते. लता मंगेशकर व त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपूर्वी कोल्हापुरातील पन्हाळागडावर चार-पाच दिवसांकरिता येत होते.

अनेक आठवणी पाण्यात वाहून गेल्या. मात्र, -

दरम्यान, लता मंगेशकर आशा भोसले यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरातील प्रयाग चिखली येथील मोहन यादव व जनार्दन यादव यांच्या घरी आवर्जून एक दिवस यायचा आणि कुटुंबियांसोबत टाईम घालवत चुलीसमोर बसून जेवण करायचे, त्यात त्यांना कोल्हापुरी मटनसह कोल्हापुरातील तयार होणारे एक विशिष्ट प्रकारचे पापडदेखील खूप आवडायचे, असे जनार्दन यादव यांनी 'ईटीवी'शी बोलताना सांगितले. लतादीदी कोल्हापूरच्या चिखली येथे आल्या, की यादव कुटुंबियांच्या गुळ तयार होणाऱ्या गुऱ्हाळ घरामध्ये अवश्य जात असत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून लतादीदी सारख्या आजारी असायच्या यामुळे ते कोल्हापुरात यायचे बंद झाले. दरम्यान, जनार्दन यादव यांनी लता मंगेशकर व त्यांच्या कुटुंबियांसह असलेल्या अनेक गोष्टी जतन करून ठेवलेल्या होत्या. मात्र, चिखली हे असे गाव आहे, की जिथे दर वर्षी महापुराचा फटका बसत असतो. गेल्या महापुरामध्येदेखील त्यांचे घर पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या अनेक आठवणी पाण्यात वाहून गेल्या. मात्र, काही राहिलेल्या गोष्टी त्यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना शेअर केले आहेत.

हेही वाचा - Lata Mangeshkar Funeral Update : शिवाजी पार्कवर होणार लतादीदींच्या पार्थिवावर अत्यसंस्कार; जाणून घ्या ताजे अपडेट

Last Updated : Feb 6, 2022, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.