ETV Bharat / city

Kolhapur Panchaganga Flood : पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; चिखलीतील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर - कोल्हापूर पंचगंगेला पूर मराठी बातमी

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली ( Kolhapur Panchaganga Flood ) आहे. त्यामुळे कोल्हापुरातील चिखली गावाला या पुराचा सर्वात जास्त फटका बसतो. तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं ( Evacuation Of Chikhali Citizens To Safer Places ) आहे.

Evacuation Of Chikhali Citizens To Safer Places

author img

By

Published : Jul 14, 2022, 6:59 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरात महापूराचा सर्वाधिक फटका ज्या चिखली गावाला बसतो, त्या गावकऱ्यांनी इशारा पातळी ओलांडण्याआधीच स्थलांतर होण्यास सुरुवात केली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 37.4 फुटांवर पोहोचली ( Kolhapur Panchaganga Flood ) असून, पुढच्या काही तासांमध्ये इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे, तर धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीने सुद्धा आपल्या कार्यालयातील सर्व दप्तर सुरक्षितस्थळी हलविले आहे. आज ( 14 जुलै ) सायंकाळपर्यंत गावातील जनावरे सुद्धा स्थलांतरित होतील, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी गोरख गिरीगोसावी यांनी ( Evacuation Of Chikhali Citizens To Safer Places ) दिली.

गावात 'इतकी' लोकसंख्या - चिखली गावाची लोकसंख्या जवळपास 6 हजार 350 इतकी लोकसंख्या असून, सर्व गावच पाण्याखाली जात असते. त्यामुळे खबरदारी म्हणून गेल्या 4 दिवसांपासून गावामध्ये दवंडी देऊन तसेच एनडीआरएफ पथकाकडून पाहणी करून स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहेत. 2019 आणि 2021 च्या महापुराचा अनुभव नागरिकांना असल्याने नागरिक स्वतःचे आणि जनावरांचे स्थलांतर करत आहेत.

चिखलीतील नागरिकांच्या स्थलांतराबाबत माहिती देताना ग्रामविकास अधिकारी

शासनाच्या सूचनेनुसार आत्ताच स्थलांतर करा - चिखली आणि आंबेवाडी गावातील काही नागरिक शासनाच्या सूचना असून, सुद्धा पुराचे पाणी गावात शिरेपर्यंत स्थलांतर करत नाहीत. त्यामुळे या सर्वांना रेस्क्यू करून गावातून बाहेर काढावे लागते. त्यामुळे अशा पद्धतीने बेसावध निष्काळजीपणा न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आत्ताच स्थलांतर करा, असे आवाहन करण्यात येत आहे.

एनडीआरएफ पथक तैनात - पूराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नेटके नियोजन केले असून, एक आठवड्यापूर्वीच एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ भागात तैनात करण्यात आली असून, दुसरी तुकडी कोल्हापूर शहरात तैनात आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असेही सांगण्यात येत आहे. गरज भासल्यास आणखी तुकड्या बोलाविण्यात येतील, अशी माहितीही मिळत आहे.

पावसाचा जोर ओसरला तर महापुराचे संकट टळेल - गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी अगदी संथगतीने इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. प्रत्येक तासाला एक ते दोन इंच इतकी पाणीपातळी सध्या वाढत असून, सध्या 37.4 इतकी पाणीपातळी आहे. त्यामुळे 39 फूट इशारा पातळी गाठण्यासाठी आणखी 10 तास लागतील, अशी शक्यता आहे. शिवाय राधानगरी धरण भरले नसल्याने विसर्ग सुद्धा होत नाही. त्यामुळे हा एक कोल्हापूरकरांसाठी मोठा दिलासा आहे. पावसाचा जोर दोन दिवसांच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यामुळे असाच पाऊस कमी राहिला तर कदाचित महापुराचे संकट सुद्धा जिल्ह्यावरून टळेल, असेही अभ्यासकांचे मत आहे

पोलीस प्रशानसानाल सहकार्य करण्याचे आवाहन - सांभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पोलीस विभाग सज्ज आहे. पावसाच्या पाण्याने ओढे, नाले ओसंडून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्यास वाहनधारकांनी अशावेळी पाण्यात वाहने घालू नयेत. रस्त्यावर पाणी आले असल्यास एसटी, बसेस देखील पाण्यात घालून नये, जेणेकरून दुर्घटना होणार नाही. गरज भासल्यास पोलीस प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाच्या 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे यांनी केलं आहे.

हेही वाचा - Panchganga: पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.