कोल्हापूर : पुणे पोलीस कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले असून सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलिस कोर्टात दाखल झाले आहेत. कोल्हापूर सत्र न्यायालयाने सदावर्ते याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Gunratna Sadavarte 14 Days Judicial Custody) सुनावली आहे. त्यानंतर सदावर्ते यांच्याकडून जामीनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलीस कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले असून सदावर्ते याचा ताबा मुंबई न्यायालयातून घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सदावर्ते यांना न्यायालयात नेताना तसेच बाहेर काढताना सुद्धा त्याने 'जय हिंद', 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. शिवाय शाहू नगरीत मला न्याय मिळेल असेही सदावर्ते याने यावेळी म्हंटले. 2020 साली सदावर्ते यांनी माध्यमाच्या मुलाखतीत प्रक्षोभक विधान केले होते. त्या प्रकरणी त्याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल आहे.
![Gunratna Sadavarte](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-kop-05-sadavarte-jamin-story-2022-7204450_25042022122501_2504f_1650869701_1029.jpg)
काय आहे प्रकरण -
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण विरोधातील याचिकेच्या निकालाविरोधात ना पसंती दर्शवत अनेक वृत्त वाहिन्यांमधून कार्यक्रमात काही आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा ( Offensive language about Maratha community ) वापरून मराठा जाती विरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे.