ETV Bharat / city

शमा मुल्ला यांना पालिकेचा दणका; अतिक्रमण करून बांधलेली इमारत केली जमीनदोस्त - पोलिस बंदोबस्तात ही कारवाई यादवनगरात करण्यात आली.

सार्वजनिक शौचालयासाठी राखीव जागेत तरुण मंडळासाठी इमारत बांधण्यात आल्याचे कोल्हापुरात उघड झाले. यावर महानगर पालिकेने हातोडा चालवला असून यादवनगरात पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

erect illegal construction with police protection
अतिक्रमण करून बांधलेली इमारत केली जमीनदोस्त
author img

By

Published : Dec 5, 2019, 6:00 PM IST

कोल्हापूर - शहरातील यादवनगर परिसरात सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित असलेल्या जागी, माजी उपमहापौर आणि नुकतेच नागरसेविकेचे पद रद्द झालेल्या शमा मुल्ला यांनी अतिक्रमण करून एका ग्रुपसाठी आरसीसी इमारत बांधली होती. ही इमारत पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

अतिक्रमण करून बांधलेली इमारत केली जमीनदोस्त

मोक्का कायद्यांतर्गत शमा मुल्ला आणि समीर मुल्ला यांच्यावर कारवाई झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती घेतली. यादरम्यान इंडियन ग्रुपच्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम मुल्ला यांनी केले असल्याचे समोर आले होते. त्याचा जिल्हा पोलीस प्रशासनाने महापालिकेशी पत्रव्यवहार करून संबंधित अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात यादवनगर येथील अतिक्रमण करून बांधलेली इमारत पाडली.

Intro:अँकर - कोल्हापुरातील यादव नगर परिसरात सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित असलेल्या जागी, माजी उपमहापौर आणि नुकतेच नागरसेविकेचे पद रद्द झालेल्या शमा मुल्ला यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून एका ग्रुपसाठी आरसीसी इमारत बांधली होती. मोक्का कायद्यांतर्गत शमा मुल्ला आणि समीर मुल्ला यांच्यावर कारवाई झाल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने त्यांच्या संपत्ती बद्दल माहिती घेतली. यादरम्यान इंडियन ग्रुपच्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम मुल्ला यांनी केले असल्याचे समोर आले होते. त्याचा जिल्हा पोलिस प्रशासनाने महापालिकेशी पत्रव्यवहार करून संबंधित अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात यादवनगर येथील अतिक्रमण केलेल्या इमारत पाडण्यात आली.

बाईट - प्रेरणा कट्टे, शहर डीवायएसपी Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.