ETV Bharat / city

Jijau Brigade Protest in Kolhapur : कोल्हापुरात 'महागाईचा भोंगा' आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चुलीवर केल्या भाकरी - jijau brigade protest in kolhapur

एकीकडे देशभरात महागाईने उच्चांक गाठला आहे, असे असतानाही राज्यात राजकारणी मात्र भोंग्याच्या राजकारणात अडकले आहेत. त्यामुळे सरकारला तसेच नेत्यांना सर्वसामान्यांचा आवाज पोहोचावा, यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच 'महागाईचा भोंगा' आंदोलन ( Kolhapur Jijau Brigade Women Activists agitation ) केले.

Kolhapur Jijau Brigade Women Activists agitation
कोल्हापुरात महागाईचा भोंगा आंदोलन
author img

By

Published : Apr 22, 2022, 6:31 PM IST

कोल्हापूर - एकीकडे देशभरात महागाईने उच्चांक गाठला आहे, असे असतानाही राज्यात राजकारणी मात्र भोंग्याच्या राजकारणात अडकले आहेत. त्यामुळे सरकारला तसेच नेत्यांना सर्वसामान्यांचा आवाज पोहोचावा, यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच महागाईचा भोंगा आंदोलन ( Kolhapur Jijau Brigade Women Activists agitation ) केले. शिवाय यावेळी कार्यालयाच्या दारातच चूल मांडून महिलांनी भाकऱ्या बनवत महागाईचा निषेध व्यक्त केला.

कोल्हापुरात महागाईचा भोंगा आंदोलन

महागाईचा भोंगा - गेल्या काही वर्षांपासून महागाईने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. इंधन तसेच इतर सर्वच गोष्टी महागल्या आहेत. पूर्वी 450 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर जवळपास 1 हजार पार झाला आहे. त्यामुळे सामान्य घरातील महिलांना आता गॅसवरून पुन्हा चुलीवर जेवण करण्याची वेळ आली आहे. असे असताना कोणाचेच याकडे लक्ष नाही. त्यामुळेच आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही हे अनोखे आंदोलन करत असल्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या रंजना पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी आंदोलनात सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राज्यासह देशभरात ज्या भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. त्याचे आम्हाला काहीही देणेघेणे नाही मात्र या आणलेल्या भोंग्यांमधून महागाईचा निघालेला आवाज पाहून सरकारला जाग यावी असेही त्यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा - Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.