ETV Bharat / city

KMT Bus Service Kolhapur : कोल्हापुरात तोट्यातील केएमटी बस सेवा बंद करण्याची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण? पहा - demand to stop KMT Bus Service

कोल्हापूर शहरातून ज्या शहरालगतच्या गावांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची केएमटी बस सेवा KMT Bus Service of Kolhapur Municipal Corporation सुरू आहे. त्यात तोट्यातील बस सेवा आता बंद करावी KMT bus service should be stopped अशी मागणी करत बस डेपो समोरच आता ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

KMT Bus Service Kolhapur
केएमटी बस सेवा बंद करण्याची मागणी
author img

By

Published : Sep 12, 2022, 11:11 AM IST

कोल्हापूर : हद्दवाढीच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातील वातावरण आता चांगलंच तापण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकरांची हद्दवाढीबाबत मागणी आहे. मात्र आजूबाजूच्या अनेक गावात हद्दवाढीला विरोध होताना पाहायला मिळत आहे. म्हणूनच आता हे बस्सं झालं! शहरातून ज्या शहरालगतच्या गावांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची केएमटी बस सेवा KMT Bus Service of Kolhapur Municipal Corporation सुरू आहे. ती बस सेवा आता बंद करावी KMT bus service should be stopped अशी मागणी करत बस डेपो समोरच आता ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एकीकडे अनेक मार्गांवर तोटा सहन करून या बस सुरू आहेत मग हे मार्गच कायमचे बंद करा अशी मागणी या हद्दवाढ कृती समितीने केली आहे.

कोल्हापुरात तोट्यातील केएमटी बस सेवा बंद करण्याची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण? पहा

24 पैकी 22 केएमटी बस चे मार्ग तोट्यात - कोल्हापूर शहराला लागून असलेल्या अनेक गावांमध्ये सध्या कोल्हापूर महानगरपालिकेची केएमटी बस सेवा सुरू आहे. खरतर एकूण 24 मार्गांपैकी त्यातील 22 मार्ग आजच्या घडीला कोट्यावधीचा तोटा सहन करत आहेत. महिन्याला जवळपास एक कोटी 82 लाख रुपयांचा तोटा केएमटी सहन करत आहे. याचा बोजा थेट महानगरपालिकेच्या Kolhapur Municipality तिजोरीवर होत आहे. जर महिन्याला जवळपास दोन कोटी तोटा होत असेल तर, वर्षाकाठी 20 ते 22 कोटींचा फटका कोल्हापूर महानगरपालिकाला बसत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक किरकोळ विकासकामे सुद्धा यामुळे होऊ शकत नाहीत. म्हणूनच या मार्गावरील बस सेवा बंद करावी या मागणीसाठी कोल्हापुरातील कृती समितीने बस डेपो समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान, हद्दवाढीस विरोध करणाऱ्यांनीही केएमटी सेवा रोखल्यास शहरात येणारा दूध, भाजी पुरवठा रोखू, अस म्हटले होते. त्यामुळे हद्दवाढीचा मुद्दा आता पुन्हा तापणार असल्याची चिन्हे आहेत.

द्दवाढीचं प्रकरण नेमकं काय? कोल्हापूर पालिकेचे रूपांतर कोल्हापूर महापालिकेत 1972 मध्ये झाले. मात्र त्यानंतर अद्याप देखील हद्दवाढ झालेली नाही. मुळातच शहराचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींची मानसिकता देखील हद्दवाढीच्या बाजूची नाही हे वारंवार दिसून येत असते. सध्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे हद्दवाढ कृती समिती कडून हद्दवाढीची मागणी होत आहे. एकूण 18 गावांसह दोन एमआयडीचा कोल्हापूर हद्दीत समावेश करावा, असा प्रस्ताव आहे. ज्यामध्ये शिरोली, नागांव, वळिवडे-गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेवावाडी, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसीचा समावेश आहे. या प्रस्तावाला काही जण विरोध केला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाचा हद्दवाढीला विरोध असल्याचे दिसून येत आहे. या हद्दवाढीवरुन ग्रामीण आणि शहरी भाग आमने-सामने आले आहेत. या संपूर्ण प्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकही पार पडली. या बैठकीत ठोस काही निर्णय होऊ शकला नाही. उलट आंदोलनाचा इशारा हद्दवाढ कृती समितीकडून देण्यात आला होता. त्यानुसार आता हा विषय पेटल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.