ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापूरची लाईफलाईन 'केएमटी' रस्त्यावर... पण प्रवासीच मिळेनात

महापालिकेची परिवहन सेवा अर्थात केएमटी शहराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून परिवहन सेवा पूर्णपणे बंद आहे. सर्व बाजूंनी केएमटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे केएमटी सध्या प्रचंड तोट्यात आहे.

kolhapur
केएमटी बस
author img

By

Published : Jun 25, 2020, 7:49 PM IST

Updated : Jun 25, 2020, 11:37 PM IST

कोल्हापूर - शहराची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी महापालिकेची परिवहन सेवा अर्थात केएमटी सध्या प्रचंड तोट्यात आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून परिवहन सेवा पूर्णपणे बंद आहे. सर्व बाजूंनी केएमटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या शहरात काही बसच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासीच मिळत नसल्याने केएमटी आणखीनच तोट्यात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापूरची लाईफलाईन 'केएमटी' रस्त्यावर, परिवहन सेवेला 9 कोटींचा फटका

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने कोल्हापूर शहरासह शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्ये परिवहन सेवा सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून परिवहन सेवा कधी नफा तर कधी तोट्यात सुरू असते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर महापालिकेची परिवहन सेवा अर्थातच केएमटी प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये सुमारे नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तरे यांनी म्हटले आहे. शासनाने यासाठी मदत करावी, अशी मागणी सुद्धा केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इतरवेळी कोल्हापुरात जवळपास 100 बस दररोज सेवा देतात. एका बसच्या माध्यमातून जवळपास 8 ते 10 हजारांचे कलेक्शन होते. अशा सर्व बसचा विचार केल्यास दररोज 10 लाखांचे तर महिन्याकाठी 3 कोटींचे कलेक्शन होते. अनलॉक सुरू झाल्यानंतर कोल्हापूर शहरात सध्या 10 बसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. मात्र, त्याला सुद्धा खूप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. शिवाय एका बसमध्ये 22 प्रवाशांनाच घेऊन जाण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे त्या सुरू असल्या तरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 10 बसच्या माध्यमातून केवळ 15 हजारांपर्यंतच कलेक्शन होत आहे.

पूर्वी शिवाजी चौक परिसरात असणाऱ्या बस स्टॉपला केएमटी जास्तीत जास्त 1 मिनिटे थांबायची. तेवढ्या वेळात बस पूर्णपणे भरून जायची. मात्र, आता तब्बल 15 ते 20 मिनिटे थांबून प्रवाशांची वाट पाहावी लागत असल्याचे केएमटीच्या वाहकांनी म्हटले आहे.

कोल्हापूर परिवहनमध्ये एकूण 850 कर्मचारी काम करत आहेत. त्या सर्वांच्या वेतनावर जवळपास 2 कोटी रुपये खर्च होत असतो. महापालिकेच्या मदतीमुळे त्यांचे मार्च महिन्याचे संपूर्ण वेतन दिले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कर्मचाऱ्यांचे 75 टक्के वेतन दिले आहे. सध्याची परिस्थिती पाहता आणि यापुढे नागरिकांना केएमटीच्या माध्यमातून सेवा द्यायची असल्यामुळे शासनाने सुद्धा याचा विचार करून यासाठी निधी द्यावा अशी मागणी होत आहे.

Last Updated : Jun 25, 2020, 11:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.