ETV Bharat / city

Protest by Shiv Sainiks: शिवसैनिकांकडून काडसिद्धेश्वर महाराजांसह कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध; नेमकं काय आहे कारण ? - Kadsiddheshwar Maharaj Protest by Shiv Sainiks

Protest by Shiv Sainiks: कोल्हापूरातील सिद्धीगिरी मठावर उभारण्यात येणाऱ्या 'कर्नाटक भवन'ला आता मोठा विरोध होताना दिसत आहे. Protest by Shiv Sainiks याबाबत शिवसैनिकांनी आवाज उठवला असून कर्नाटक मुख्यमंत्र्यांसह काडसिद्धेश्वर महाराजांचाही निषेध शिवसैनिकांनी केला आहे. एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागासाठी लढा सुरू आहे. यामध्ये अनेकजण हुतात्मा झाले आहेत.

Protest by Shiv Sainiks
Protest by Shiv Sainiks
author img

By

Published : Oct 13, 2022, 5:30 PM IST

Updated : Oct 13, 2022, 7:11 PM IST

कोल्हापूर: कोल्हापूरातील सिद्धीगिरी मठावर उभारण्यात येणाऱ्या 'कर्नाटक भवन'ला आता मोठा विरोध होताना दिसत आहे. Protest by Shiv Sainiks याबाबत शिवसैनिकांनी आवाज उठवला असून कर्नाटक मुख्यमंत्र्यांसह काडसिद्धेश्वर महाराजांचाही निषेध शिवसैनिकांनी केला आहे. एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागासाठी लढा सुरू आहे. यामध्ये अनेकजण हुतात्मा झाले आहेत. असे असताना आमच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्रात येऊन, जर कर्नाटक सरकार Government of Karnataka कर्नाटक भवन निर्माण करण्यासाठी निधी देत असेल आणि त्याला इथले काडसिद्धेश्वर महाराज जागा देत असतील तर हे लाजिरवाणे असल्याचेही शिवसैनिकांनी म्हटले आहे.

शिवसैनिकांकडून काडसिद्धेश्वर महाराजांसह कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध

काय आहे नेमकं प्रकरण ? 2 दिवसांपूर्वी कोल्हापूरातल्या कणेरी मठ येथे 'संत संमेलन' पार पडले. या कार्यक्रमासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह मंत्री व्ही. सोमन्ना, शशिकला जोल्ले, सी. सी. पाटील, मुरगेश निरानी, प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री, गोविंद कारजोळ, शंकर पाटील मुनीनकोप्पा आदी नेते मंडळींनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी अवघे कणेरी मठ 'कर्नाटकमय' झाले होते.

या कार्यक्रमाचे अनेक ठिकाणी कन्नड भाषेत होर्डिंग लावण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कणेरी मठामध्ये कर्नाटक भवनासाठी 5 कोटी देण्याबाबत घोषणा केली आहे. शिवाय काहीही मदत लागल्यास आपले सहकार्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यालाच आता विरोध होत असून ज्या काडसिद्धेश्वर महाराजांचा हा कमेरी मठ आहे. त्यांनी सुद्धा अशा गोष्टींना थारा देऊ नये, असे शिवसैनिकांनी म्हटले आहे. शिवाय एखाद्या विशिष्ट पक्षाचे काम करण्यासाठी ते प्रयत्न करत असतील, तर आपला आक्षेप असल्याचेही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

काडसिद्धेश्वर महाराजांच्या आजवरच्या कार्याचा गौरवच पण... दरम्यान, ज्या कर्नाटक सरकारकडून नेहमीच मराठी भाषिकांवर अन्याय झाला आहे. ज्या मराठी भाषिकांच्या हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सीमा लढा सुरू आहे. त्याच कर्नाटकसाठी 'कर्नाटक भवन' बांधायला काडसिद्धेश्वर महाराज महाराष्ट्रात जागा देतात. हे आमच्यासाठी लाजिरवाने आहे असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कणेरीमठ येथे आजवर झालेल्या कार्याचा, जनसेवेचा आम्ही आदरच करतो आणि करत राहणार. मात्र अशाप्रकारे विशिष्ट पक्षासाठी काम करत असाल तर आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणाचे असे महाराष्ट्रात येऊन कार्यक्रम घेण्याचे धाडस झाले नाही. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांचे असे धाडस होत आहे. दरम्यान, वेळ पडल्यास कर्नाटक भवनचे फलक उतरू असेही शिवसैनिकांनी इशारा दिला आहे.

Last Updated : Oct 13, 2022, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.