ETV Bharat / city

Kolhapur Protest In Front Of Temple : जोतिबा मंदिरासमोर ई- पास बंद करा म्हणत हजारो ग्रामस्थांचे बेमुदत ठिय्या आंदोलन - ई- पासची सक्ती मागे घेण्याची मागणी

कोल्हापुरात प्रसिद्ध असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा मंदिरासमोर ( Dakhkhancha Raja Jyotiba Temple Kolhapur ) ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले ( Kolhapur Protest In Front Of Temple ) आहे. कोरोना काळात करण्यात आलेली ई- पासची सक्ती मागे घेण्याची मागणी करण्यात येत ( Demand for Withdrawal of E-Pass ) आहे.

जोतिबा मंदिरासमोर ई- पास बंद करा म्हणत हजारो ग्रामस्थांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

author img

By

Published : Mar 11, 2022, 3:24 PM IST

कोल्हापूर : कोरोना काळात प्रतिबंधात्मक नियम म्हणून घालण्यात आलेल्या निर्बंधातून मुक्तता करावी ( Demand for Withdrawal of E-Pass ) यासाठी, कोल्हापुरातील श्री क्षेत्र दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात ( Dakhkhancha Raja Jyotiba Temple Kolhapur ) ग्रामस्थांकडून आंदोलन सुरू करण्यात आले ( Kolhapur Protest In Front Of Temple ) आहे. दहा गावातील हजारो नागरिकांनी यात सहभागी होत जोतिबा मंदिराच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भाविकांना ज्योतिबाच्या दर्शनासाठी लागणाऱ्या ई-पास ची सक्ती बंद करून मंदिराचे सर्व दरवाजे उघडण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. आजपासून सुरू केलेल्या या बेमुदत ठिय्या आंदोलनात ग्रामस्थांची जोरदार घोषणाबाजी करत चैत्र यात्रेपूर्वी निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा येथील आंदोलकांनी दिला आहे.

जोतिबा मंदिरासमोर ई- पास बंद करा म्हणत हजारो ग्रामस्थांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार श्री अंबाबाई मंदिरातील आणि ज्योतिबा मंदिरातील सर्व नियम शिथिल करण्यात आले होते. मात्र, दर्शनासाठी लागणाऱ्या ई-पास ची सुविधा ही चालूच ठेवण्यात आली होती. या शिवाय मुखदर्शनची व्यवस्था देखील पुन्हा सुरुवात करण्यात येणार होती.

ई पास रद्द करा ग्रामस्थांची मागणी

गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कोरोना संसर्गामुळे कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर तसेच दख्खनचा राजा जोतिबा येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळत भाविकांना दर्शन दिले जात होते. यावेळी लहान मुलांना मंदिरात प्रवेश बंदी होती. तर सर्व भाविकांना दर्शनासाठी ई पास बंधनकारक करण्यात आले होते. तसेच भाविकांची मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून दर ताशी दर्शन संख्येवर मर्यादा आणली होती. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी राज्यात कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारच्यावतीने सर्व नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानुसार अंबाबाई मंदिर तसेच दख्खनचा राजा जोतिबा या मंदिरातील देखील सर्व नियम शिथिल करण्यात आले होते. तसेच लहान मुलांना मंदिरात प्रवेश देखील देण्यात आला होता. तर दोन्ही मंदिरातील मुख दर्शन देखील सुरू करण्यात येणार होते. ई-पास व्यवस्थेमुळे भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन घेता येत असल्याने ई पास सुविधा सुरूच ठेवण्यात आले होते. या सुविधेमुळे भविकांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र येथील स्थानिकांकडून आता या ई पासला विरोध होताना पाहायला मिळत आहे. ई-पास सुविधा रद्द करून मंदिरातील सर्व दरवाजे उघडावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली. असून मंदिर प्रशासना विरोधात दख्खनचा राजा जोतिबा मंदिराच्या दारात ग्रामस्थांकडून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात दहा गावातील हजारो ग्रामस्थ एकत्र आले आहेत. चैत्र यात्रेपूर्वी ई पास सुविधा बंद करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मंदिरातील सर्व दरवाजे भाविकांसाठी उघडण्याची मागणी

दख्खनचा राजा जोतिबा मंदिरास व करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदीरास एकूण चार दरवाजे आहेत.अंबाबाई मंदिरात सध्या दोन दरवाजे सुरू असून, एकातून भाविकांना मंदिरात येण्याची सुविधा तर दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर जाण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच महाद्वाररोडच्या गेटमधून भाविकांसाठी मुखदर्शनाची सोय करण्यात येत आहे. तसेच घाटी दरवाजा हा आपत्कालीन वापरासाठी ठेवण्यात आला आहे. तर अशीच सुविधा ज्योतिबा मंदिरात देखील असून, एका दरवाज्यातून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येतो तर दुसऱ्या दरवाजा हा मंदिरातून बाहेर पडण्यासाठी वापरण्यात येतो. तिसरा दरवाजा हा फक्त पुजाऱ्यांना मंदिरात ये-जा करण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तर चौथा दरवाजा हा आपत्कालीन वापरासाठी असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ग्रामस्थांकडून हे सर्व दरवाजे उघडण्याची मागणी होत आहे. तर दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात मुखदर्शनाची सोय करण्यात येत असून, मंदिरातील काही अडथळे दूर करण्याचे काम सध्या सुरू आहेत. हे काम पूर्ण होताच ज्योतिबा मंदिरात देखील मुखदर्शन चालू करण्यात येणार असल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.