कोल्हापूर कोरोनामुळे मागील दोन वर्षांत कोणतेच सण उत्सव साजरे करता आले नव्हते. मात्र आता सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. शिवाय मोठ्या जल्लोषात सर्व सण साजरे करा म्हंटल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे Ganeshotsav वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाचा गणेशोत्सव सुद्धा आता धुमधडाक्यात साजरा केला जाणार असून बाजारपेठा Kolhapur market ग्राहकांमुळे गजबजल्या आहेत. कोल्हापूरातील महानगरपालिका परिसरात अनेक डेकोरेशनचे साहित्य मिळणारी होलसेल तसेच रिटेल दुकान आहेत. या सर्वच दुकानांमध्ये आता ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक दुकानदार तर दोन वर्षांपासून जी मंदी आणि आर्थिक संकट सहन करावे लागले ते आता निघून गेले असून सर्व भरून निघेल असे सांगत आहेत.
बाजारपेठमध्ये विविध वस्तू दाखल दरम्यान, गणेशोत्सव निमित्ताने आरास सुंदर व्हावी यासाठी बाजारपेठमध्ये विविध वस्तू दाखल Various items are introduced in the market झाल्या आहेत. यामध्ये मोत्याची माळ, सुंदर मंदिर, तयार फेटे, लाईट्स आदींच्या हजारो व्हारायची उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये अगदी 50 रुपयांपासून 1 हजारांपर्यंत अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत.
हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 कोल्हापुरातले बिनखांबी गणेश मंदिर, शेंदूर काढल्याने मूळ मूर्ती उजेडात