ETV Bharat / city

तर राज्य सरकार कोरोनावरील लस मोफत देण्याचा प्रयत्न करेल- आरोग्य राज्यमंत्री

कोरोनावरील लस सर्व नागरिकांना मोफत मिळाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका आहे. ही लस मोफत द्यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

author img

By

Published : Jan 8, 2021, 3:49 PM IST

कोल्हापूर - कोरोनावरील लस सर्व नागरिकांना मोफत मिळाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका आहे. ही लस मोफत द्यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारने याला परवानगी नाही दिली तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निश्चितपणे लस मोफत देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाबाबत निर्णय-

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात २९ हजार ५०० जणांची नोंदणी झाली आहे. आज जिल्ह्यात चार ठिकाणी ड्राय रन चाचणी सुरू केली आहे. पुढच्या टप्प्यात इतर कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनावरील लस देता शक्य होणार आहे. जिल्ह्याची संपूर्ण तयारी झाली आहे. केंद्र व राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल. परवानगी मिळताच लसीकरणाला सुरुवात केली जाईल. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी दिली.

संपूर्ण राज्याची कोरोना लसीकरणाबाबतची तयारी पूर्ण-

राज्यात सर्वच ठिकाणी ड्रायरन पूर्ण होत आली आहे. तसेच संपूर्ण राज्याची कोरोना लसीकरणाबाबतची तयारी पूर्ण आहे. केंद्र सरकारच्या अनुमतीने लसीकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिली. दरम्यान आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयाला भेट देत ड्रायरन केंद्राची पाहणी केली. तसेच डॉक्टर योग्य सल्ला आणि निवड झालेल्या लोकांची चौकशी केली.

हेही वाचा- काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर नावाचा वापर सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.