ETV Bharat / city

काहीच लक्षणे नसल्यास 'पॉझिटिव्ह' रुग्णांवर घरीच उपचार; आयुक्त कलशेट्टी यांचा निर्णय - kalshetti on corona patients kolhapur

काहीच लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या देखरेखीखाली घरी स्वतंत्र उपचार केले जाणार असल्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे.

coronavirus updates kolhapur
काहीच लक्षणे नसल्यास 'पॉझिटिव्ह' रुग्णांवर घरीच उपचार ; आयुक्त कलशेट्टी यांचा निर्णय
author img

By

Published : Jul 23, 2020, 6:22 PM IST

कोल्हापूर - काहीच लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या देखरेखीखाली घरी स्वतंत्र उपचार केले जाणार असल्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे. संबंधित रुग्णांच्या घरात सर्व प्रकारच्या व्यवस्था असाव्या, असे त्यांनी सांगितले. सध्या दोन रुग्णांवर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

काहीच लक्षणे नसल्यास 'पॉझिटिव्ह' रुग्णांवर घरीच उपचार ; आयुक्त कलशेट्टी यांचा निर्णय

संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात सध्या 500हून अधिक बाधित रुग्ण आहेत. रुग्णसंख्या याच वेगाने वाढल्यास रुग्णांच्या घरी स्वतंत्र व्यवस्था करून रुग्णालयाच्या माध्यमातून होम क्वारंन्टाइन करून घरीच उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी परिसरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडे संबंधित जबाबदारी देण्यात येणार आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील डॉक्टरांची यादी तयार करून ठेवावी, असे आदेश देखील महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत. काहीच लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयाच्या परवानगीने त्यांच्या देखरेखीखाली घरी स्वतंत्र उपचार करण्यात येणार आहेत. सध्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

घरात स्वतंत्र जागा नसलेल्या रुग्णांसाठी हॉटेलमध्ये देखील संस्थात्मक क्वारंन्टाइची सोय करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.