ETV Bharat / city

कोल्हापूरात हेलिकॉप्टरचा अपघात टळला; शाळेच्या पटांगणावर इमर्जन्सी लँडिंग - kolhapur marathi news

यांत्रिक बिघाड झाल्याने आज कोल्हापूरतल्या करवीर तालुक्यात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

Helicopter crash averted in Kolhapur
कोल्हापूरात हेलिकॉप्टरचा अपघात टळला;
author img

By

Published : Feb 23, 2021, 9:12 PM IST

कोल्हापूर - यांत्रिक बिघाड झाल्याने आज कोल्हापूरतल्या करवीर तालुक्यात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असलेल्या कुंभी कारखाना परिसरात एका खासगी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर येथील एका शाळेच्या मैदानावर उतरवले. यावेळी मैदानावर कोणीही नसल्याने पायलटला हेलिकॉप्टर मैदानावर उतरवता आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अचानक घेडलेल्या या प्रसंगामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट आणि व्यक्ती सुद्धा होता.

कोल्हापूरात हेलिकॉप्टरचा अपघात टळला
स.ब.खाडे महाविद्यालयाच्या पटांगणावर उतरले हेलिकॉप्टर-
आज सकाळी कुंभी कारखाना परिसरात आकाशात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने पायलट परिसरात लँडिंग साठी जागा शोधत होता. त्यातच त्याला येथील स.ब.खाडे महाविद्यालयाचे भव्य पटांगण नजरेज पडले. शिवाय विद्यार्थी वर्गामध्येच असल्याने मैदान मोकळे होते. त्यामुळे कोणताही विलंब न करता पायलटने स.ब.खाडे महाविद्यालयाच्या पटांगणावर हेलिकॉप्टरचे लँडिंग केले. कोरोना असल्यामुळे अकरा वाजता होणारी प्रार्थना बंद करण्यात आली होती, त्यामुळे पटांगणावर विद्यार्थी नव्हते. दरम्यान, वेळीच हेलिकॉप्टरचे लँडिंग व्यवस्थित झाल्याने मोठा अनर्थ टळला.
गारगोटी येथील पॅसेंजर मुंबईला घेऊन जाणार असल्याची माहिती -
यावेळी महाविद्यालयाचे शिक्षकांनी पायलटशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जमलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वर्गात बसण्याची सूचना दिल्या. तब्बल दोन अडीच तासानंतर बारा वाजता पोलीस आले आणि यावेळी पायलट वेणू माधव यांनी याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, पुण्याहून एरो ट्रान्स या खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर आहे. सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला अचानक खाली उतरवण्यात आले. हे हेलिकॉप्टर पुणे येथून आले होते, गारगोटी येथून पॅसेंजर घेऊन मुंबईला जाणार होते. दरम्यान, या घटनेची माहिती पुण्यात कंपनीला कळविण्यात आली असून हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी प्रतिनिधी येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा- पोहरादेवी गर्दी प्रकरण : प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.