कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या ( North Kolhapur by poll election ) पोटनिवडणुकीत प्रचार खालच्या पातळीवर गेल्याबद्दल ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपण खालच्या पातळीवर जाऊ नका. विकासकामांवर निवडणूक होऊ द्या, अशी विनंती करूनही प्रचार खालच्या पातळीवर गेल्याने त्यांनी ( Hasan Mushrif slammed Chandrakant Patil ) म्हटले आहे.
कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन - सध्या कोल्हापुरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचारासाठी मोठमोठे नेते कोल्हापुरात दाखल ( Kolhapur Election campaign ) होत आहेत. मात्र, प्रचार करताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असताना वापरात येणारी भाषा ही अत्यंत खालच्या स्तरावर गेली आहे. आता हा प्रचार वैयक्तिक पातळीवर जाऊन होऊ लागला आहे. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ( Hasan Mushrif displeasure on election ) नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान महाविकासआघाडी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. कोल्हापूरच्या विकासाचे व्हिजन घेऊन, आम्ही पुढे आलेले आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत दादा हा मोठा माणूस - चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतरच शरद पवार हे पंतप्रधानांना कसे भेटायला गेले, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर मुश्रीफ म्हणाले, की मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे चंद्रकांत कसे कळाले, असा प्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केलाय. शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय यंत्रणा गैरवापर करतात, याची चर्चा झाली असावी. तसेच चंद्रकांत दादा हा मोठा माणूस आहे आपण फार छोटा माणूस आहे असा टोला ही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा- Power Crisis In State : राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घेऊ - नितीन राऊत