कोल्हापूर - काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Statement On Hindutva ) यांनी पुण्यात एका कार्यक्रमात भाजपला ५ हजार वर्षांचा इतिहास असल्याचे सांगत हिंदुत्वाचे संदर्भ देत वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif Replied To Chandrakant Patil ) यांनी मिश्किल टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील हे मुक्त विद्यापीठ असल्याचे म्हटले आहे. भारतीय जनता पार्टीची स्थापना कधी झाली, हे त्यांनी पाहावं. खरं तर चंद्रकांत पाटील यांना काय बोलावं, हेच कळत नाही. यापुढे चंद्रकांत पाटलांची वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही, असेही म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणजे मुक्त विद्यापीठ- चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात भाषणामध्ये भाजपा ही काही १९५१ साली स्थापन झालेला पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास असल्याचं हिंदुत्वाचा संदर्भ देत म्हटलं आहे. आता यावर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील हे मुक्त विद्यापीठ असून त्यांच्यावर काय बोलायचे हेच कळत नाही त्यामुळे त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.