कोल्हापूर - कोरोनावरील उपचारासाठी लागणाऱ्या साहित्यावरील जीएसटी रद्द करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली होती. याला अनुसरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी जीएसटी कौन्सिल उपसमिती नियुक्त केली. त्याचे अध्यक्षपद मेघालय सारख्या छोट्या राज्यातील अर्थमंत्र्याला दिले. हा पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
मुश्रीफ पुढे म्हणाले, वास्तविक महाराष्ट्र सर्वाधिक जीएसटी देतो. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आहे. तर मृत्यूंची संख्या ही सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त कोरोनावरील औषध खरेदी देखील महाराष्ट्रात होते. असे असताना मेघालय सारख्या राज्यात अध्यक्षपद देणे हे महाराष्ट्राचा अपमान आहे.
जीएसटी कौन्सिल समितीचे अध्यक्षपद मेघालयला, केंद्राकडून महाराष्ट्राचा अपमान - मुश्रीफ - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी जीएसटी कौन्सिल उपसमिती नियुक्त केली. त्याचे अध्यक्षपद मेघालय सारख्या छोट्या राज्यातील अर्थमंत्र्याला दिले. हा पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.