ETV Bharat / city

Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येस सात वर्ष पूर्ण; मॉर्निंग वॉकचे आयोजन - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला ( Govind Pansare Murder Case ) 7 वर्ष उलटून गेलेत. मात्र, त्यांची हत्या कुणी केली याचा तपास आणखी लागलेला नाही. या तपासात कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या कालावधीत अनेक पोलीस अधिकारी कोल्हापुरात येऊन गेले. प्रत्येक वेळी तपासात हे ना ते कारण देत कॉम्रेड पानसरे यांना न्याय देण्यापासून वंचित ठेवले आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण
Govind Pansare Murder Case
author img

By

Published : Feb 20, 2022, 10:18 AM IST

कोल्हापूर - ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची ( Govind Pansare Murder Case ) हत्या होऊन आज सात वर्षे पूर्ण झाली. मात्र, अजूनही या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नाही. मारेकरी आजही मोकाट आहेत. तसेच तपास यंत्रणेला तपासात येणाऱ्या अडथळ्यांमुळे होणारी दिरंगाई या सर्वांवर नाराजी व्यक्त करत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज मॉर्निंग वॉकचे आयोजन केले. जोपर्यंत हत्येचा तपास लागत नाही, तोपर्यंत लढा देत रस्त्यावर उतरत राहू, असा इशारा सुनीलकुमार लवटे आणि मेघा पानसरे यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांच्या प्रतीमेस अभिवादन करण्यात आले. तसेच एन डी पाटील आणि पानसरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

पानसरेंच्या स्मृती प्रित्यर्थ मॉर्निंग वॉकचे आयोजन

मॉर्निंग वॉकदरम्यान 'गोविंद पानसरे अमर रहे', 'हम सब पानसरे', 'पानसरे जी को लाल सलाम' आशा घोषणा देत तपास यंत्रणांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये पानसरे यांचा मृत्यू झाला, तर उमा पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या. आज या घटनेला सात वर्षं पूर्ण झाली. मात्र, अद्याप मारेकऱ्यांचा सुगावा तपास यंत्रणेला लागलेला नाही. तसेच सध्या हा खटला न्यायालयात आहे. यातील काही आरोपींना दोष मुक्त करण्याचा अर्ज देखील न्यालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र, यावर निर्णय अजून दिला गेलेला नाही.

पानसरेंच्या स्मृती प्रित्यर्थ ज्या ठिकाणी गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, त्या ठिकाणी आज डाव्या चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी मेघा पानसरे देखील उपस्थित होत्या. यावेळी खऱ्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तपास यंत्रणा अद्याप मुख्य अरोपींपर्यंत पोहचू शकलेली नाही. त्यामुळे, आज मॉर्निंग वॉक दरम्यान निषेध नोंदवण्यात पानसरे यांच्या घरापासून ते पानसरे यांच्या स्मृती स्थळापर्यंत काढण्यात आला. यावेळी पानसरे कुटुंबीय तसेच कॉम्रेड आणि अनुयायी उपस्थित होते.

हेही वाचा - पानसरे हत्या प्रकरण : आणखी चौघांवर चारशे पानांचे दोषारोपपत्र दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.