कोल्हापूर - एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र पुरग्रस्तांच्या व्यथा पाहून अस्वस्थ झालेला असताना ज्यांच्यावर दुखीतांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी आहेत, ते मंत्री महोदय मात्र पूर पाहणी करताना पर्यटनाचा आनंद घेत आहेत की काय, असा व्हिडीओ समोर आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पूरपाहणी दौऱ्या दरम्यानचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.
सांगली, कोल्हापूर भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या सहकाऱ्यांसोबत दौऱ्यावर असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे पर्यटनाचे भाव पाहून हे राज्याचे पालन कर्ते आहेत की जनतेच्या जखमेवर मिट चोळणारे, अशीच भावना नागरिकांच्या मनात येत आहे.
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची असंवेदनशीलता सुरूच
कोल्हापूर आणि सांगली मध्ये नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन जगत आहेत. सांगलीत बुधवारी झालेल्या बोट दूर्घटलेत १० निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तर मंत्र्यांचा हा पूर पर्यटनाचा व्हिडीओ पिडीतांच्या जखमेवर मीट चोळणारे आहे. अशा प्रतिक्रीया सध्या उमटत आहे. या पूर्वीही सावित्री नदी दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मंत्री प्रकाश मेहता यांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरला नव्हता.