कोल्हापूर - कोल्हापुरातील पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर एका चार चाकी आणि पोलीस वाहनात (Four wheeler hit the police van ) जोरदार धडक झाली. सकाळी साडेदहा वाजता घटना आहे. पोलिसांची चार चाकी गाडी पोलीस मुख्यालयातून निघून कळंबा मार्ग गडहिंग्लजसाठी आरोपीला घेऊन जाताना हा अपघात घडला आहे. कार चालक प्रदीप दिवाण आणि त्यांचे कुटुंबीय कसबा बावड्याकडून ताराराणी चौकाकडे जाताना कारची पोलीस गाडीची जोरदार धडक झाली. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत नाही. मात्र, दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
असा घडला अपघात
वोक्सवॅगन कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक MH09DM5885 ही गाडी कसबा बावड्यामार्गे कावळा नाकाकडे जात होती. यावेळी पोलीस मुखल्यातून एक पोलिस व्हॅन गाडी क्रमांक MH09EM0298 ही कळंबा च्या दिशेने आरोपीस घेण्यास निघाली होती. एवढ्यात गेट मधून बाहेर पडताच पोलीस व्हॅनला भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक झाली. हा अपघात एवढ्या जोरात होता की कारच्या समोरची बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. यातील प्रदीप दिवाण हे जिल्हा परिषदमध्ये कामाला आहेत. ते त्यांच्या मुलगी आणि आणि बायकोसोबत दुसऱ्या मुलीस भेटायला निघाले होते.
पोलिस व्हॅन आरोपीस घेण्यासाठी निघाले होते
पोलिस मुख्यालयातून पोलीस व्हॅन ही कळंबाकडे आरोपीस घेण्यासाठी निघाली होती. तिथून ते गडींगलजकडे जाणार होते. इतक्यात कार भरधाव वेगात येऊन धडकली असे पोलीस व्हॅन चालक उदयसिंग महादेव पवार यांनी सांगितले. कार चालक प्रदीप दिवाण आणि त्यांचे कुटुंबीय हे सुरक्षित गाडीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत नाही. मात्र, दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - Drone Attack : राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका; प्रमुख शहरात अलर्ट