ETV Bharat / city

फुटबॉल वेड्या कोल्हापुरात अनोखे सलून, फुटबॉल स्टेडियममध्ये केस कापल्याचा घेता येणार आनंद - फुटबॉल वेड्या कोल्हापुरात अनोखे सलून

कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापूरला फुटबॉल पंढरी म्हणून ओळखले जाते. कोल्हापुरातल्या याच फुटबॉल शौकिनासाठी ओंकार काशीद या तरुणाने खास फुटबॉल फिवर सलून सुरू केले आहे. या सलूनला पूर्णपणे फुटबॉल मैदानाचा आकार देण्यात आला असून आतंरराष्ट्रीय संघाचे खेळाडू, किट, शूज, लावण्यात आले आहेत.

Football stadium shaped salon in Kolhapur

author img

By

Published : Mar 6, 2021, 4:41 PM IST

कोल्हापूर - कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापूरला फुटबॉल पंढरी म्हणून ओळखले जाते. कोल्हापुरातल्या याच फुटबॉल शौकिनांसाठी ओंकार काशीद या तरुणाने खास फुटबॉल फिवर सलून सुरू केले आहे. या सलूनला पूर्णपणे फुटबॉल मैदानाचा आकार देण्यात आला असून आतंरराष्ट्रीय संघाचे खेळाडू, किट, शूज, लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील पहिले सलून नेमके कसे आहे, पाहुयात ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट..

फुटबॉल वेड्या कोल्हापुरात अनोखे सलून
कोल्हापूरला कुस्ती पंढरी अशी ओळख आहे. त्याचबरोबर संस्थान काळात छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापुरात फुटबॉल खेळ रुजवला. त्यापासूनच कोल्हापूरची जनता आज ही फुटबॉलसाठी वेडी आहे. याला प्रोत्साहन म्हणून दरवर्षी वेगवेगळे टूर्नामेंट कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर पार पडतात. कोल्हापूरकरांचे फुटबॉलवर असणारे प्रेम हे जगजाहीर आहे. तसेच कोल्हापूर म्हटले की कला आणि क्रीडा हे समीकरण काही नवीन नाही. कोल्हापूरच्या कलेची जगभर ख्याती आहे. याची प्रचिती अनेक वेळा आली आहे. यात आणखीन एक भर बुधवार पेठ येथे राहणाऱ्या ओंकार काशीद घातली आहे. फुटबॉलची आवड असणाऱ्या ओमकारने हा ट्रेंड लक्षात घेऊन त्याने फुटबॉल स्टेडियमचा आकार देत त्यात सलून सुरू केले आहे. अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण असे सलून शनिवार पेठेत एन के नावाने साकारले आहे.

हेही वाचा - कोरोनाचा वाढता आलेख, मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर!

या सलूनचे संपूर्ण इंटेरियर डिझाईन हे फुटबॉल या संकल्पनेवर आधारित आहे. पवन भोसले यांनी ही संकल्पना तयार केली आहे. या सलूनमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला फुटबॉलच्या मैदानात असल्याचा भास तर होतोच, शिवाय जगभरातील फूटबॉल खेळाडूंचे फोटो आणि त्यांची माहिती देखील दाखवण्यात आली आहे. फुटबॉल ट्रेड वर कोल्हापुरात प्रथमत साकारलेली ही संकल्पना कोल्हापूरकर तर स्वीकारतीलच. त्याचबरोबर ही सर्वत्र नावारूपास येईल, असा विश्वास ओंकार काशीद आणि पवन भोसले यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा - नाट्यमय पद्धतीनं राज्यसभेत राजीनामा देणारे दिनेश त्रिवेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश

काय आहे या सलून मध्ये..

जवळपास सहा ते सात लाख रुपये खर्चून काशीद यांनी हे सलून तयार केले आहे. या सलूनमध्ये गोल पोस्ट, रेफ्री कार्ड, रेफ्री शूज, संघांचे टी-शर्ट, आंतरराष्ट्रीय संघांचे लोगो, खेळाडूंचे रेखाचित्रे, प्लेयर वेटिंग स्टॅन्ड, फुटबॉल त्याचबरोबर फुटबॉलच्या मॅचेस बघत केस कापण्याचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी केलेल्या हेअर स्टाईल या सलूनमध्ये केल्या जाणार असल्याची माहिती ओमकार काशीद यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.