ETV Bharat / city

Kolhapur Rain Update : कोल्हापूरकरांवरील महापुराचे संकट तूर्तास तरी टळले; पाणीपातळीत झपाट्याने घट - Water Level of Panchganga Decreasing rapidly

कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तरी कोल्हापुरात पंचगंगेने अजून इशारा पातळीही ओलांडली नव्हती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने ( Rain has Receded ) पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोल्हापूरकरांवर कोसळणारे महापुराचे संकट तूर्तास तरी टळले आहे, असे चित्र दिसत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना तूर्तास तरी दिलासा ( People of Kolhapur have Got a Relief ) मिळाला आहे.

Panchganga river
पंचगंगा नदी
author img

By

Published : Jul 18, 2022, 5:18 PM IST

Updated : Jul 19, 2022, 8:47 PM IST

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे ( Rain has Receded ) कोल्हापूरकरांना दिलासा ( People of Kolhapur have Got a Relief ) मिळाला आहे. 2019 आणि 2021 नंतर पुन्हा एकदा महापुराला सामोरे जावे लागते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगा नदी इशारा पातळीपर्यंत जाऊन पोहोचली होती. अनेकांचे स्थलांतर सुरू झाले होते. मात्र, निसर्गाने कोल्हापूरकरांची प्रार्थना ऐकली आणि पावसाचा जोर कमी झाला. पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमीच असेल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. कालपासून तर अनेकदा सूर्यदर्शनही झाले आहे. शिवाय पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सध्यातरी कोल्हापूरकरांवरील महापुराचे संकट टळल्याचे दिसून येत आहे. ( Water Level of Panchganga Decreasing rapidly )

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली :
जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला असला तरी अजूनही जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली आहेत. सध्याची पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे 36.10 इंच इतकी पाणीपातळी आहे. कालपासून 1 फुटांनी पाणीपातळी कमी झाली आहे. इशारा पातळी 39 फूट आहे तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. मात्र इशारा पातळी गाठायला 1 फूट बाकी असतानाच पावसाचा जोर ओसारल्याने महापुराचे संकट आता तरी टळले आहे. अध्याप राधानगरी धरणसुद्धा 74 टक्के इतकेच भरले आहे. त्यामुळे अजून धरण भरण्यासाठी 10 ते 15 दिवस पाऊस लागण्याची गरज आहे.

तीन ते चार दिवसांपूर्वी नदीची पाणीपातीळी इशारा पातळीच्या दीड फूट होती : कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीची ( Panchganga river in Kolhapur ) पाणीपातळी खूपच संथगतीने वाढत चालली आहे. मागील नऊ तासांत पाणीपातळी केवळ 1 इंचाने वाढली असून, इशारा पातळी गाठायला अजूनही जवळपास दीड फूट बाकी आहे. सध्याची पाणीपातळी 37.8 फूट इतकी ( Current Water Level is 37.8 Feet ) आहे. इशारा पातळी 39 फुटांवर आहे आणि धोका पातळी 43 फुटांवर आहे. पावसाचा जोर जर वाढला तर पुढच्या 10 ते 12 तासांपर्यंत इशारा पातळी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ( Collector Rahul Rekhawar )

विविध विभागांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार ( Collector Rahul Rekhawar ) यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील महत्त्वाचे विभाग ज्यामध्ये पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू केला आहे. ( Started 24 Hours Flood Management Control Room

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक - १) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक - १०७७, दूरध्वनी क्रमांक - २६५९२३२/२६५२९५०/२६५२९५३/२६५२९५४, २) जिल्हा परिषद –आरोग्य २६६१६५३, ३) पोलिस विभाग-२६६२३३३/११२, ४) सार्वजनिक बांधकाम-२६५१४५७, ५) जिल्हा परिषद बांधकाम-९९७५०९८६८९ (सचिन खाडे), ६) राष्ट्रीय महामार्ग- २६५२९६०, ७) पाटबंधारे- २६५४७३६, ८) महावितरण- ७८७५७६९१०३

हेही वाचा : Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे ( Rain has Receded ) कोल्हापूरकरांना दिलासा ( People of Kolhapur have Got a Relief ) मिळाला आहे. 2019 आणि 2021 नंतर पुन्हा एकदा महापुराला सामोरे जावे लागते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगा नदी इशारा पातळीपर्यंत जाऊन पोहोचली होती. अनेकांचे स्थलांतर सुरू झाले होते. मात्र, निसर्गाने कोल्हापूरकरांची प्रार्थना ऐकली आणि पावसाचा जोर कमी झाला. पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमीच असेल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. कालपासून तर अनेकदा सूर्यदर्शनही झाले आहे. शिवाय पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सध्यातरी कोल्हापूरकरांवरील महापुराचे संकट टळल्याचे दिसून येत आहे. ( Water Level of Panchganga Decreasing rapidly )

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा
जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली : जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला असला तरी अजूनही जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली आहेत. सध्याची पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे 36.10 इंच इतकी पाणीपातळी आहे. कालपासून 1 फुटांनी पाणीपातळी कमी झाली आहे. इशारा पातळी 39 फूट आहे तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. मात्र इशारा पातळी गाठायला 1 फूट बाकी असतानाच पावसाचा जोर ओसारल्याने महापुराचे संकट आता तरी टळले आहे. अध्याप राधानगरी धरणसुद्धा 74 टक्के इतकेच भरले आहे. त्यामुळे अजून धरण भरण्यासाठी 10 ते 15 दिवस पाऊस लागण्याची गरज आहे.

तीन ते चार दिवसांपूर्वी नदीची पाणीपातीळी इशारा पातळीच्या दीड फूट होती : कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीची ( Panchganga river in Kolhapur ) पाणीपातळी खूपच संथगतीने वाढत चालली आहे. मागील नऊ तासांत पाणीपातळी केवळ 1 इंचाने वाढली असून, इशारा पातळी गाठायला अजूनही जवळपास दीड फूट बाकी आहे. सध्याची पाणीपातळी 37.8 फूट इतकी ( Current Water Level is 37.8 Feet ) आहे. इशारा पातळी 39 फुटांवर आहे आणि धोका पातळी 43 फुटांवर आहे. पावसाचा जोर जर वाढला तर पुढच्या 10 ते 12 तासांपर्यंत इशारा पातळी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ( Collector Rahul Rekhawar )

विविध विभागांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार ( Collector Rahul Rekhawar ) यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील महत्त्वाचे विभाग ज्यामध्ये पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू केला आहे. ( Started 24 Hours Flood Management Control Room

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक - १) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक - १०७७, दूरध्वनी क्रमांक - २६५९२३२/२६५२९५०/२६५२९५३/२६५२९५४, २) जिल्हा परिषद –आरोग्य २६६१६५३, ३) पोलिस विभाग-२६६२३३३/११२, ४) सार्वजनिक बांधकाम-२६५१४५७, ५) जिल्हा परिषद बांधकाम-९९७५०९८६८९ (सचिन खाडे), ६) राष्ट्रीय महामार्ग- २६५२९६०, ७) पाटबंधारे- २६५४७३६, ८) महावितरण- ७८७५७६९१०३

हेही वाचा : Bus Fell In Narmada River : इंदोरहून अंमळनेरला येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

Last Updated : Jul 19, 2022, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.