कोल्हापूर - कोल्हापुरात ओमायक्रोनचा ( Omicron Kolhapur ) पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. ऑस्ट्रेलियावरून आलेल्या 45 वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. ऑस्ट्रेलियावरून एकूण 5 जण कोल्हापुरात आले असता सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यातील 4 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचा अहवाल ओमायक्रोनच्या चाचणीसाठी पुण्यामध्ये पाठविण्यात आला असून आता सर्वांना त्याची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा - Deepak Dalvi Face Blackened : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवींवर शाई फेक; उद्या बेळगाव बंदची हाक
400 हून अधिक नागरिक परदेशातून कोल्हापुरात
दरम्यान ओमायक्रोनचे रुग्ण जसजसे वाढू लागले आहेत तसतसे कडक निर्बंध घातले जात आहेत. परदेशातून आलेल्या प्रत्येकाची तपासणी करून भारतात घेतले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा परदेशातून तब्बल 432 नागरिक आले असून, त्यातील 330 जणांना शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यातील 300 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर 30 जणांचे अहवाल अध्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियावरून आलेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे, हा रुग्ण नेमका ओमायक्रोन व्हेरिएंटचा आहे का? याच्या तपासणीसाठी त्याचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा - VIDEO : संजय राऊत यांनी आगी लावण्याचे धंदे बंद करावेत - नारायण राणे