ETV Bharat / city

Diwali Celebration : कळंबा कारागृहात कैद्यांनी बनवलेल्या दीपावलीच्या साहित्यांचा मेळा, बघुया खास रिपोर्ट - Diwali 2022

दीपावलीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. काही दिवसांवर दीपावली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अणेकजण आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य आदी खरेदीसाठी (Exhibition of Diwali materials made by inmates) बाहेर पडत आहेत. आपणही जर दीपावलीच्या खरेदीसाठी बाहेर पडणार असाल आणि खरेदी कुठे (Kalamba Jail) करावी? असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी अवश्य पाहा. Diwali Celebration

Diwali Celebration
दीपावलीच्या साहित्यांचा मेळा
author img

By

Published : Oct 18, 2022, 7:27 PM IST

Updated : Oct 21, 2022, 4:50 PM IST

कोल्हापूर : दीपावलीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. काही दिवसांवर दीपावली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अणेकजण आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य आदी खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. आपणही जर दीपावलीच्या खरेदीसाठी बाहेर पडणार असाल आणि खरेदी कुठे करावी? असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी अवश्य पाहा. कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहातील (Kalamba Jail) कैद्यांनी चक्क दीपावलीचे साहित्य (Exhibition of Diwali materials made by inmates) बनविले असून; त्यांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी इथले स्थानिक नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. याबाबतच सविस्तर आढावा घेतला आहे, आमच्या ईटिव्ही प्रतिनिधींनी. Diwali Celebration

कारागृह अधीक्षक व कैद्यांशी संवाद साधतांना ईटिव्ही प्रतिनिधी
दररोज लाखोंची उलाढाल : दीपावलीनिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात कैद्यांकडून आकाश कंदील, पणत्या, फराळाचे पदार्थ आदी बनवून घेतले जात असतात. या सर्व वस्तू कळंबा कारागृहाबाहेरच दरवर्षी विक्रीसाठी ठेवल्या जातात. जवळपास एक ते दीड आठवडा याचे प्रदर्शन आणि विक्री सुरू असते. दिवसभरात लाख ते दीड लाख रुपयांची उलाढाल होत असते. आता सुद्धा पहिल्याच दिवशी तब्बल 75 हजारांची उलाढाल झाली असूनच संपूर्ण मेळाव्यात 50 ते 60 लाखांपर्यंत उलाढाल होत असते.

गेल्या 8 वर्षांपासूनचा उपक्रम : गेल्या अनेक वर्षांपासून कैद्यांकडून विविध वस्तू बनविल्या जात आहेत. मात्र 8 वर्षांपासून कळंबा कारागृहाबाहेरच मोठा स्टॉल उभा करून, त्यामध्ये दीपावलीच्या एक आठवडा पूर्वी याची विक्री सुरू केली आहे. या 8 वर्षांत लाखोंची उलाढाल झाली असून, यापुढेही नागरिकांनी कैद्यांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करून सहकार्य करावे, असे आवाहन कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले आहे.

कारागृहाकडून कैद्यांना प्रशिक्षण : रागाच्या भरात हातून घडलेल्या काही चुकांमुळे कैदी कारागृहात आपली शिक्षा भोगत असतात. मात्र हेच कैदी जेंव्हा शिक्षा भोगून कारागृहाबाहेत पडतील तेंव्हा त्यांच्या हाताला एखादे चांगले काम मिळावे आणि ते मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी कारागृहाकडून कैद्यांना विविध वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन मिळते. यामध्ये बेकरी, शेती, फौंड्री, शिवणकाम, सुतारकाम, कापड, शोभेच्या वस्तू आदी विभाग आहेत. त्याप्रमाणे कैद्यांना प्रशिक्षण दिले जाते. दीपावलीच्या पूर्वी त्यांच्याकडून आकर्षक पणत्या, आकाशकंदील बनवून घेतले जातात. Diwali Celebration

Last Updated : Oct 21, 2022, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.