ETV Bharat / city

Omicron Variant : कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर तपासणी नागरिकांची सुरू पण...

कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश हवा असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह (Negative RTPCR Report) असायला हवा शिवाय लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले आहे.

Omicron Variant
Omicron Variant
author img

By

Published : Dec 3, 2021, 7:20 PM IST

Updated : Dec 3, 2021, 10:19 PM IST

कोल्हापूर : ईटीव्ही भारतने (Etv Bharat Impact) प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत आणि ओमायक्रोनचा (Omicron Variant) संभाव्य धोका ओळखून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राच्या सीमेवर तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश हवा असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह (Negative RTPCR Report) असायला हवा शिवाय लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.

कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर तपासणी नागरिकांची सुरू

संभाव्य धोका प्रशासन झाले जागे

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या नवीन कोरोना व्हेरीयंट ओमायक्रोनमुळे महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेत नवीन नियमावली जारी केली आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकात प्रवेश हवा असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच नियम आता महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास लागू केले आहेत. स्वतः कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत दोन दिवसांपूर्वी आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात आजपासून सीमेवर काही कर्मचारी तैनात केले आहेत. कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांचा आरटीपीसीआर रिपोर्ट आणि लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत का याची तपासणी करून महाराष्ट्रात सोडण्यात येत आहे. मात्र ज्या पद्धतीने कर्नाटक प्रशासन कोणत्याही परिस्थितीत रिपोर्ट नसणाऱ्या प्रवाशांना कर्नाटकमध्ये सोडत नाही. तसे कडक निर्णय महाराष्ट्रातील सीमेवर पहाण्यास मिळत नाहीत. यामध्ये सुधारणा करून तात्काळ कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Omicron Variant
प्रवाशांची केली जाते तपासणी

कर्नाटकमधून येणाऱ्या प्रवाशांना परत पाठविण्याची गरज
कर्नाटकमध्ये दोन ओमायक्रोन व्हेरीयंटची लागण झालेले रुग्ण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यातच रुग्ण आढळल्याने कोल्हापूर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहे. येथील कागल तालुक्यात महाराष्ट्राच्या सीमेवर तपासणी सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नाही किंवा दोन्ही डोस नसलेल्या प्रवाशांना पुन्हा मागे पाठवण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.

तपासणी केवळ दाखवण्यासाठीच ?

कर्नाटकात प्रवेश हवा असल्यास आरटीपीसीआर रिपोर्ट आणि लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय प्रवेश देत नाही. मात्र, हेच महाराष्ट्राच्या नाक्यांवर होताना पाहायला मिळत नाही. एकीकडे कर्नाटक मध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले असताना प्रशासन अध्याप गंभीर नाही का ? शिवाय केवळ तपासणी दाखविण्यासाठीच सुरू आहे का ? असा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना पडला असल्याची प्रतिक्रिया कृती समितीचे रमेश मोरे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Omicron Symptoms and Precautions : ओमायक्राॅन भारतात, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

Last Updated : Dec 3, 2021, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.