ETV Bharat / city

Eco Friendly Ganesh Utsav 2022 : 'किसान विघ्नहर्ता' कोल्हापूरातील एका शाळेत साकारल्या; गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती - Eco Friendly Ganesh Utsav 2022

Eco Friendly Ganesh Utsav 2022 : कोल्हापूरातील कणेरीमठ येथील गुरुकुल विद्यालयातील विध्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक आणि चक्क गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्यात येत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी एक- दोन नव्हे तर तब्बल 7 ते 8 हजार मूर्ती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले असून जास्तीत जास्त लोकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापराव्यात असा संदेश यावेळी देण्यात आला आहे.

Eco Friendly Ganesh Utsav 2022
Etv BhaEco Friendly Ganesh Utsav 2022rat
author img

By

Published : Aug 6, 2022, 1:15 PM IST

Updated : Aug 6, 2022, 2:26 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरातील कणेरीमठ येथील गुरुकुल विद्यालयातील विध्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक आणि चक्क गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती बनविण्यात येत आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी एक- दोन नव्हे तर तब्बल 7 ते 8 हजार मूर्ती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले असून जास्तीत जास्त लोकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापराव्यात असा संदेश त्यांनी दिला आहे. शिवाय या गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर त्यापासून खत सुद्धा मिळू शकते. त्यामुळे याचा वापर करावा, असे गुरुकुल विद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Eco Friendly Ganesh Utsav 2022

अशी साकार झाली शेणापासून गणेशमूर्ती - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची संख्या वाफहात असल्याने दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याबाबत आवाहन केले जाते. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी मातीचा अनेकजण वापर आहेत. मात्र, सिद्धगिरी मठावर हजारांवर जनावरे आहेत. त्यामध्ये गाईंचे प्रमाण सुद्धा खूप आहे. त्यामुळे याच देशी गाईंच्या शेणाचा उपयोग मूर्ती निर्मितीसाठी केला जाऊ शकतो, ही संकल्पना सुरुवातीला समोर आली. त्यानुसार गुरुकुल मधील विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्याबाबत निर्णय झाला. त्यानुसार या मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला गाईचे शेण पूर्णपणे वाळवले जात आहे. वाळलेले शेण नंतर फोडून ते मातीच्या रुपात बारीक केले जाते.

Eco Friendly Ganesh Utsav 2022
Eco Friendly Ganesh Utsav 2022

किसान विघ्नहर्ता नाव देण्यात आले - एका मोठ्या चाळणीमधून बारीक मातीच्या रुपात मिळालेले शेण पुढच्या प्रक्रियेसाठी जाते. या मातीच्या रूपातील शेणामध्ये गवारगम मिसळून त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळले जाते. पाण्याने हे मिश्रण एकजीव करून त्याचे गोळे बनवले जातात. पुढे गणेशमूर्ती ज्या मोल्डिंगमध्ये बनविल्या जातात. त्यामध्ये हे गोळे घालून त्याच्यापासून सुंदर मूर्तीत रूपांतर होते. त्याला पुढे अनेक नैसर्गिक रंगांचा वापर करून अधिक सुंदर बनविले जाते. या मूर्ती अगदी मातीच्या मूर्ती असल्याच्या जाणवतात. शिवाय याचा पर्यावरणाला सुद्धा कोणताही धोका नसून उलट पर्यावरणासाठी तसेच शेतकऱ्यांना तर खत म्हणून विसर्जनानंतर वापरता येऊ शकते, असे गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी यांनी सांगितले आहे. याला "किसान विघ्नहर्ता" असे नाव देण्यात आले आहे.

Eco Friendly Ganesh Utsav 2022
Eco Friendly Ganesh Utsav 2022

7 ते 8 हजार गणेशमूर्ती बनविणार - दरम्यान, कानेरीमठ येथे असलेल्या या अनोख्या गुरुकुल विद्यालयात मुलांना 4 वेद, 6 शास्त्र आणि 64 प्रकारच्या विद्या शिकविल्या जातात. याठिकाणी राज्यभरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अगदी मोफत शिक्षण असलेल्या या विद्यालयात विद्यार्थ्यांना 12 वर्षे शाळा पूर्ण झाल्यानंतर त्याने स्वतःच्या पायावर उभे राहून एक व्यावसायिक बनावे आणि अनेकांना नोकऱ्या द्याव्या हा यामागचा उद्देश आहे. शिवाय शाळा सोडल्यानंतर त्याला 5 लाख रुपये सुद्धा त्याच्या सुरू करणाऱ्या व्यवसायासाठी दिले जाणार आहेत. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हे गुरुकुल सुरू असून याठिकाणी अनेक भागांतील विद्यार्थी आले आहेत.

Eco Friendly Ganesh Utsav 2022
Eco Friendly Ganesh Utsav 2022

गुरुकुल विद्यालयाला नक्की भेट द्या - सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने गणेशमूर्ती बनविण्याचे प्राथमिक शिक्षण त्यांना दिले जात आहे. शिवाय शेणापासूनच राखी सुद्धा बनवायला शिकवले जातात आहे. यावर्षी जवळपास 7 ते 8 हजार गणेशमूर्ती बनविल्या जाणार असून पुढच्या वर्षी नागरिकांच्या प्रतिसादावरून 50 हजारांपर्यंत गणेशमूर्ती बनविण्याचा संकल्प असल्याचे प्राचार्यांनी म्हंटले आहे. या मूर्ती नागरिकांना अगदी माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. एक 350 आणि मोठी 650 रुपयांना ही मूर्ती विक्री केली जात आहे. सध्या कोल्हापूरात सुद्धा विविध ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्ह्याबाहेर सुद्धा गणेशमूर्ती पाठविल्या जात आहेत. अजूनही कोणाला या मूर्ती हव्या असतील, तर कणेरीमठ येथील गुरुकुल विद्यालयाला नक्की भेट द्या.

हेही वाचा - Governor Koshyari controversial statement : मोदींपूर्वी भारतीयांना जगात जो मान.. या विधानामुळे राज्यपाल पुन्हा ठरले टीकेचे धनी

हेही वाचा - Terrible Accident : भरधाव स्कार्पिओने दोन मोटरसायकलींना उडवले, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडिओ

Last Updated : Aug 6, 2022, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.